Sambhajinagar Rain Saam tv
ऍग्रो वन

Sambhajinagar Rain : एकीकडे पावसाचा हाहाकार तर संभाजीनगर जिल्ह्यात १० दिवसापासून पावसाची दडी; पिकांनी टाकल्या माना

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : राज्यात एकीकडे पावसाने हाहाकार केला आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील १० ते १२ दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी आता चांगलाच चिंतेत सापडला. खरीप हंगामातील लागवड झालेल्या कपाशी, मका, तूर यासह आदी पिकांनी माना टाकल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

राज्यातील मुंबई. पुण्यासह रायगड, सिंधुदुर्ग, बुलढाणा, अकोला जिल्ह्यात (Rain) पावसाने हाहाकार माजविला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात तर अतिवृष्टी झाल्याने शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे (Sambhajiangar) संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे. मागील दहा दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. सुरवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत बसला आहे. 

संभाजीनगर जिल्ह्यात खरीप हंगामातील लागवड योग्य पाऊस झाल्याने (Farmer) शेतकरी सुखावला होता. शिवाय जोमात खरीप हंगामातील लागवड केली होती. मात्र मागील दहा दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे लागवड केलेली पिके वाचवायची तरी कशी; असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. शेतातील पिके पाण्याअभावी मन टाकू लागले असून काही ठिकाणी पिके कोमेजू लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Kirtan: 'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले

Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT