sambhajinagar krushi department appeals farmers to check seeds before purchasing it Saam Digital
ऍग्रो वन

Sambhajinagar: शेतकऱ्यांनो सावधान, जाहिरातींना भुलू नका; संभाजीनगरात बाेगस बियाणे विक्रेत्यांवर कृषीची नजर

Bogus Seeds : अनेकदा भेसळयुक्त खते आणि बियाणांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले. संभाजीनगर जिल्ह्यातील बाजारपेठेत विविध कंपन्यांकडून बियाणे विक्रीच्या बनावट जाहिराती केल्या जाताहेत.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

बोगस खते, बियाणे विक्रीला लगाम लावण्यासाठी कृषी विभागाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कारवाया सुरू केल्या आहेत. यामुळे बाेगस बियाणे विक्रेत्यांचे दाबे धणाणले आहेत. दरम्यान बियाणे, खते आणि औषधी खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सध्या शेतकरी वर्ग बी बियाणे खते आणि औषधी खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. तशी लगबग आता सुरू आहे. परंतु बी बियाणे, खते खरेदी करण्यापूर्वी खताची तपासणी करणे आवश्यक आहे.

अनेकदा भेसळयुक्त खते आणि बियाणांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी बियाणे आणि औषधी खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन आता कृषी विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील बाजारपेठेत सध्या विविध कंपन्यांकडून बियाणे विक्रीच्या बनावट जाहिराती दाखवून शेतकऱ्यांना आकर्षित केले जाते आणि बनावट बियाणे शेतकऱ्याच्या हाती दिले जाऊन ऐन लागवड आणि पेरणीच्या काळात दिवसाढवळ्या फसवणूक होते. परंतु आता या बनावट बियाणांच्या विक्रीला लगाम लावण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यात कृषी विभागाने बेधडक कारवाया सुरू केल्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Infection: किडनी इन्फेक्शनची ही लक्षणे ओळखा, वेळेवर उपचार न केल्यास होतील मोठे नुकसान

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Malegaon : बनावट जन्म दाखला प्रकरणी चौथा गुन्हा दाखल; महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह दोघांना अटक

Krutika Deo: या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीची मालिकेत एन्ट्री, सुष्मिता सेनसोबतही केलंय काम

GK: कोणत्या ग्रहावर एक दिवस पृथ्वीच्या एका वर्षाच्या कालावधीइतका असतो?

SCROLL FOR NEXT