seema jadhav grows organic strawberry in her farm saam tv
ऍग्रो वन

Success Story : जाधव कुटुंबियांच्या प्रयत्नांना यश, सेंद्रिय स्ट्रॉबेरीला मिळू लागला प्रति किलो चारशे रुपये भाव

दिलीप कांबळे

Maval News :

हिवाळा म्हटलं की सर्व जण महाबळेश्वरला जाऊन लाल, केशरी चुटुक स्ट्रॉबेरी (strawberry) खाण्यासाठी जात असतात. पण आता महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी थेट खेडच्या चिंबळी या गावात बघायला मिळणार आहे. चिंबळीच्या प्रगतीशील शेतकरी सीमा जाधव (strawberry grower seema jadhav) यांनी प्रयाेग करुन स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले आहे. त्यातून त्यांना उत्तम उत्पन्न मिळू लागले आहे. (Maharashtra News)

सीमा जाधव आणि चंद्रकांत जाधव हे शेतावर नवनवीन शेतीत प्रयोग करत असतात. आपल्या दहा गुंठे क्षेत्रावर महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरी नाभिला जातीची पाच हजार रोपे आणून त्याची लागवड त्यांनी केली.

सर्व शेती त्या सेंद्रिय पद्धतीने करतात. ठिबक सिंचन आणि मलचींग पेपरचा वापर करून सहा ऑक्टोबरला त्यांनी स्ट्राॅबेरीची लागवड केली होती. डिसेंबरच्या पंधरवड्यावर स्ट्रॉबेरी फळांची काढणी ही चालू करण्यात आली.

शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री लाल चुटुकदार स्ट्रॉबेरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या सोसायटीमध्ये विकली जाऊ लागली आहे. केवळ विकली जात नसून सेंद्रिय स्ट्रॉबेरीला प्रति किलोला चारशे रुपये भाव मिळू लागला आहे. साधारण अडीच हजार किलो स्ट्रॉबेरी फळे या शेतीतून उत्पन्न मिळण्याचा अपेक्षा जाधव कुटुंबियांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीम आणि चंद्रकांत जाधव म्हणाले सुरवातीला एक लाख रुपये खर्च करून दहा गुंठेवर हे स्ट्रॉबेरीचं पीक घेण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला. रोपे,ठिबक संच,मालचींग पेपर आणि बेड बनविणे याचा खर्च एक लाख वजा जाता नऊ लाखाचे निव्वळ फायदा हाेईल असे वाटते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

Surat Tourism Place: नवरात्रीत बहरलं सुरत; मंत्रमुग्ध करणाऱ्या या ठिकाणांना आवश्य भेट द्या

Navaratri 2024 : मुंबईत 'या' देवीच्या मंदिरातील भिंत आहे खूप खास, सर्व इच्छा होतील पूर्ण

SCROLL FOR NEXT