सातारा शहरातील मुख्य बस स्थानक (satara bus stand) परिसरात सातत्याने हाेणा-या वाहतूक कोंडीचा (traffic jam) प्रश्न साेडविण्यासाठी सातारा पाेलिस दलाने (satara police) ठाेस पावले उचचली आहेत. पाेवई नाका (powai naka) तहसिल कार्यालय मार्गे बस स्थानकात जाणा-या वाहनांना उजव्या बाजूस वळण्यास बंदी घालण्यात आली आहे. येत्या 25 डिसेंबरच्या मध्यरात्रपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पाेलिस दलाने म्हटले आहे. (Maharashtra News)
एसी समीर शेख यांच्या आदेशान्वय सातारा शहरातील पोवई नाका येथून जाणाऱ्या एसटी बससह (msrtc bus) अन्य वाहनांना बस स्थानकात (इन व आउट गेटसमोरून) जाता किंवा बाहेर येता येणार नाही. पोवई नाका किंवा गणपतराव तपासे मार्ग (राधिका रस्ता) येथून येणाऱ्या कोणत्याही वाहनांना (इन व आउट गेटसमोरून) उजवीकडे वळसा मारता येणार नाही. बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या सर्व बसला देखील उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे.
नव्या नियमानूसार पोवई नाका येथून येणाऱ्या बस व अन्य वाहनांनी भूविकास बॅंक चौकातून वळसा मारुन बस स्थानकाकडे यावे. तसेच बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बस या पोवई नाका येथून जूनी डीसीडी बॅंके मार्गे पारंगे चाैक, जुने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चौकातून राष्ट्रीय महामार्गाकडे जातील.
नो पार्किंग झोन
सातारा मुख्य बस स्थानक नजकीच्या मार्केट यार्ड येथील माजी राज्यपाल गणपतराव तपासे मार्ग आणि मनाली कॉर्नरला जोडणारा रस्ता हा नो पार्किंग झोन (no parking zone) जाहीर करण्यात आला आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहने लावली जातात. रस्ता रुंदीने लहान असल्याने वाहतूकी कोंडी होत असल्याची वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन हा रस्ता नो पार्किंग झोन जाहीर केला गेला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.