Onions Auction Saam tv
ऍग्रो वन

Onions Auction : व्यापारी-शेतकरी एकत्रित येत खाजगी जागेत कांदा लिलाव; बाजार समितीत १० दिवसांपासून बंद आहे लिलाव

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या वेगवेगळ्या कारणांमुळे बंद असल्याने मागील १० दिवसांपासून कांदा लिलाव प्रक्रिया बंद आहे.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : गेल्या १० दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील (Nashik) बाजार समिती मधील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून यावर तोडगा म्हणून व्यापारी व (Farmer) शेतकऱ्यांनी एकत्र येत खाजगी जागेवर जाऊन कांदा लिलाव करण्यास सुरवात केली आहे. (Tajya Batmya)

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या वेगवेगळ्या कारणांमुळे बंद असल्याने मागील १० दिवसांपासून कांदा लिलाव प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होऊन कांदा विक्रीला नेता येत नसल्याने (Bajar samiti) बाजार समितीसह शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. परिणामी बाजार समितीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी मिळून खाजगी जागेत जात (Onion) कांदा लिलाव प्रक्रिया पार पाडण्यास सुरवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हमाली, तोलाईही वाचली 

व्यापारी व शेतकऱ्यांनी एकत्रित येत उमराने येथे खाजगी जागेत कांदा लिलाव सुरू केले. त्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून साधारण १४०० ते १५०० रुपयांचा भाव मिळाला. विशेष म्हणजे खाजगी जागेत लिलाव सुरू असल्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हमाली, तोलाई, वराई शेतकऱ्यांकडून कपात केली जात नसल्याने त्याचा फायदा व्यापारी व शेतकऱ्यांना होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT