Manasvi Choudhary
उन्हाळा सुरू झाला की त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्वचा तेलकट होणे, त्वचेवर पिंपल्स येणे, त्वचा काळी होणे यासारख्या समस्या उद्भवतात.
तेलकट त्वचेवर तुम्ही घरच्या घरी काही सोपे उपाय करू शकता ते कोणते हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
तेलकट त्वचेवर तुम्ही घरगुती उपाय म्हणून कोरफड आणि लिंबाचा रस हे एकत्र करून लावा यामुळे त्वचा सुधारण्यास मदत होते.
कोरफडमध्ये 'सॅलिसिलिक ॲसिड' असते जे नैसर्गिकरित्या पिंपल्स कमी करते. तसेच त्वचेला थंडावा देते आणि जळजळ थांबवते.
लिंबू हे नैसर्गिक 'ॲस्ट्रिंजेंट' आहे. यातील व्हिटॅमिन सी त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि काळे डाग फिके करण्यास मदत करते.
एका वाटीमध्ये कोरफड आणि लिंबाचा रस मिक्स करा. दोन्ही चांगले व्यवस्थित फेटून घ्या.
चेहरा स्वच्छ धुवून चेहऱ्यावर कोरफड आणि लिंबू ही पेस्ट लावा आणि नंतर १० ते १५ मिनिटांनी ही पेस्ट कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाका .