Chandwad News Saam tv
ऍग्रो वन

Chandwad News : चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; कृषीदिनी सुरू केले कांदा क्रांती आंदोलन

Nashik News : कांद्याला चांगला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी डॉ. श्याम पगार यांच्या नेतृत्वाखाली कांदा क्रांती आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : कांद्याच्या भावात होणारी सततची चढ उतार यामुळे कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. कांदा प्रश्नी कायम स्वरूपी तोडगा काढावा; या मागणीसाठी नाशिकच्या चांदवडमध्ये संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी दिनाचे औचित्य साधून कांदा क्रांती आंदोलन छेडले आहे.

कांद्याला चांगला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी डॉ. श्याम पगार यांच्या नेतृत्वाखाली कांदा क्रांती आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला आहे. कांद्याच्या दराबाबत शासनाला जाग आणण्यासाठी चार दिवसांचे अन्न त्याग लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. मोठ्या प्रमाणावर (Chandwad) कांदा उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

शासन विरोधात घोषणाबाजी 

कांद्याला उत्पादन खर्चाच्या आधारित स्थिर हमी भाव द्यावा. अन्यथा कांद्यावर लावण्यात आलेली निर्यातबंदी उठवावी, आदींसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी आंदोलनाच्या ठिकाणी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत धो धो पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली

अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; दुध टँकरची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Mumbai Rains : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, अंधेरी सबवे पाण्याखाली, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जॅम|VIDEO

LIC AAO Recruitment: LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार १६९००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Oldest Water on Earth: कॅनडातील शास्त्रज्ञांनी चाखलं २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं पाणी; शास्तज्ञांकडून पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT