सागर निकवाडे
नंदुरबार : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. यासाठी १५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली आहे. यामुळे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी व अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. नंदुरबारमध्ये हे चित्र पाहण्यास मिळत असून अनेक ठिकाणी ढकलाढकलीचे प्रकार झाल्याचे पाहण्यास मिळाले.
राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली असून आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने नंदुरबार शहरातील महिलांनी फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. लाडकी बहीण या योजनेत महिलेला महिन्याला पंधराशे रुपये मिळणार असल्याने महिला ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दिसून येत आहे. नंदुरबार शहरातील सायबर कॅफेवर महिला यांनी अर्ज भरण्यासाठी आणि अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवा जुळत करताना दिसून येत आहे.
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठीही गर्दी
योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. यामुळे अर्ज भरण्यापूर्वी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी देखील तशीच गर्दी होत आहे. तलाठी कार्यालय व तहसील कार्यालयात महिलांसह पुरुषांची देखील गर्दी झालेली पाहण्यास मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.