Zp School : जिल्हा परिषदेच्या शाळेला गावकऱ्यांनी ठोकले टाळे; धाराशिवच्या सांजा गावातील प्रकार

Dharashiv News : धाराशिव तालुक्यातील सांजा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता नववी आणि दहावी या वर्गाला २०१८ मध्ये मान्यता मिळाली आहे. असे असून देखील अद्याप देखील शाळेला शिक्षक मिळाला नाही
Zp School
Zp SchoolSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : जिल्हा परिषदेच्या शाळेत नववी व दहावीच्या वर्गाला मान्यता मिळून सहा वर्षाचा कालावधी झाला. मात्र या शाळेत वर्गांसाठी शिक्षक मिळाले नाही. वारंवार मागणी केल्यानंतरही यंदाचे वर्ष तसेच जाणार यामुळे गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप ठोकले आहे.  

Zp School
Mumbai Nashik Highway : चौथ्या दिवशीही मुंबई- नाशिक महामार्ग जाम; पुलाचे काम संथ गतीने होत असल्याने समस्या

धाराशिव तालुक्यातील सांजा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता नववी आणि दहावी या वर्गाला २०१८ मध्ये मान्यता मिळाली आहे. असे असून देखील अद्याप देखील शाळेला शिक्षक मिळाला नाही. यामुळे ग्रामस्थांनी लोकवाटा करून शिक्षकाची नेमणूक करून शाळा आतापर्यंत चालवली. जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी आक्रमक होऊन थेट शाळेला (Zp School) टाळे ठोकून शाळा बंद केली आहे.

Zp School
Shahapur News : पाच मित्रांपैकी दोन जण वाहून गेले, एकाचा मृत्यू; वैतरणा धरणावर पार्टीसाठी गेले असताना घडली घटना

तर शाळा सुरु होऊ देणार नाही 

आता जोपर्यंत शाळेला शिक्षक मिळणार नाही; तोपर्यंत शाळा सुरू होऊ देणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.आज शाळेला टाळे ठोकूनही शिक्षक नाही मिळाल्यास धाराशिव जिल्हा परिषदेतच विद्यार्थ्यांचे वर्ग भरवणार असल्याचा इशाराही ग्रामस्थ आणि पालकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com