Nandurbar News, papaya crop saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : पपईवर विषाणू सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव; नंदुरबारला 500 हेक्टर क्षेत्र प्रभावित

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात नवीन लागवड केलेल्या पपईवर विषाणू सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सुमारे 500 हेक्टर क्षेत्रावरील पपईचे पीक (papaya crop) प्रभावित झाले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांमध्ये मर असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आहे. (Maharashtra News)

राज्यातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार (nandurbar) जिल्ह्याची ओळख आहे. यावर्षी नंदुरबार जिल्ह्यात पपईच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत सात हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली आहे. मात्र नवीन लागवड केलेल्या पपईवर विषाणू सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

पपईच्या झाडाच्या पानांवर या विषाणूचा प्रादुर्भाव दिसून येत असून पाने जळून झाडाची मर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे यावर्षी पपईच्या रोपांच्या किमतींमध्ये वाढ झालेली शेतकऱ्याला एक रोप 15 रुपये ते सतरा रुपयापर्यंत नर्सरीतून मिळत आहे.

जिल्ह्यातील नंदुरबार शहादा तळोदा तालुक्यात या विषाणू सदृश्य रोगाचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत असून जवळपास 500 हेक्टर क्षेत्रावरील पिके प्रभावित झाल्या असून कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने प्रभावित झालेल्या झाडांचे नमुने तपासणीसाठी विद्यापीठाकडे पाठविण्यात आले असून नेमक्या कोणत्या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे हे अहवाल आल्यानंतरच कळणार आहे.

- नंदूरबार जिल्ह्यात जवळपास सात हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड.

- नंदुरबार तळोदा शहादा तालुक्यात विषाणू सदृश्य रोगांच्या पपईवगांवर प्रादुर्भाव..

- 500 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र प्रभावित

- शेतकऱ्यांना (farmers) मोठा आर्थिक फटका

- पपईच्या एका रोपाची किंमत पंधरा ते सतरा रुपये

- अनेक भागातील पपईच्या बागा धोक्यात.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shakib Al Hasan: काळी जादू की टेक्निक? फलंदाजी दरम्यान शाकिब अल हसनने असं का केलं? अखेर समोर आलं खरं कारण

Maharashtra News Live Updates : महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा वाद चिघळण्याची चिन्हं

Snake Video: बापरे..! रेल्वे स्टेशनमध्ये घुसला ६ फूट लांब साप, प्रवाशांची धावाधाव; धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

SBI Jobs: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची संधी; मिळणार ९३००० रुपये पगार; पात्रता काय?

Pune Crime: बुरखा घालून घरात शिरले अन् सपासप वार केले, मुलींच्या डोळ्यादेखत वडिलांची हत्या; पुणे हादरलं

SCROLL FOR NEXT