Sangli News : एनसीपी कार्यकर्त्याच्या खूनप्रकरणी सच्या डोंगरेंस अटक; कळंब्यातून विश्रामबाग पाेलिसांनी घेतलं ताब्यात

सचिन डोंगरेला दाेन जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.
Sangli, NCP, kalamba jail
Sangli, NCP, kalamba jail Saam Tv
Published On

Sangli News : सांगलीतील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला (nalsab mulla) खून प्रकरणी मुख्य सूत्रधाराला पाेलिसांनी अटक केली. मोका न्यायालयाच्या परवानगीने पोलिसांनी कळंबा कारागृहातून सचिन डाेंगरे यास ताब्यात घेतले. सच्याने खूनाचा कळंब्यातूनच कट रचला हाेता आता त्याला मोबाईल पुरविणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. (Maharashtra News)

Sangli, NCP, kalamba jail
Ashadhi Ekadashi : 120 सीसीटीव्ही कॅमेरेतून पंढरपूरवर ठेवली जातेय नजर, आषाढीसाठी पाेलिस दल सज्ज

सांगलीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता नालसाब मुल्लाचा गोळ्या झाडून व कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सच्या उर्फ सचिन डोंगरे याला विश्रामबाग पोलिसांनी कळंबा कारागृहातून अटक केली.

सचिन डोंगरे याने कळंबा कारागृहातून 22 मोबाईल कॉल करून खुनाची सूत्रे हलविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. दरम्यान नालसाबचा खून करण्यासाठी सच्या डोंगरने कळंबा कारागृहात कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे. सचिन डोंगरेला 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठाविण्यात आली आहे.

Sangli, NCP, kalamba jail
छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रीडा संकूल असे नामकरण करा : राष्ट्र विकास सेना

सचिनने एकच नंबर वेगवेगळ्या चार मोबाईलमध्ये वापरल्याचे तपासात समोर आले आहे. त्याला कळंब्यात मोबाईल पुरविणारे गुन्हेगार देखील आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. सचिन डोंगरे हा यापूर्वीच्या खून प्रकरणात आणि मोका अंतर्गत केलेल्या कारवाईमुळे कळंबा कारागृहात होता. तो मोकातून बाहेर येवू नये यासाठी नालसाब मुल्ला हा प्रयत्न करीत असल्यानेच सच्या डोंगरने सुपारी देवून त्याचा काटा काढला.

Sangli, NCP, kalamba jail
Hinganghat Bandh News : आरएसएस जिल्हा संघचालक मारहाणप्रकरणी हिंगणघाट बंद; पाेलिसांची Social Media वर नजर

त्याला कारागृहात मोबाईल कोणी पुरविले याचा देखील पोलिस तपास करीत आहेत. या खून प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी सनी कुरणे, विशाल कोळपे, स्वप्निल मलमे, रोहित मंडले, प्रशांत उर्फ बबलू चव्हाण, ऋत्विक माने या संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com