छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रीडा संकूल असे नामकरण करा : राष्ट्र विकास सेना

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे नाव
Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj
Chhatrapati Rajarshi Shahu Maharajsaam Tv

सांगली : सांगली जिल्हा हा खेळाचे माहेरघर असल्याने सांगली (sangli) मिरज (miraj) रस्त्यालगत क्रीडा संकुलात (Sangli Sports Complex) शेकडो तरुण (youth) विविध खेळात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजी मारण्यासाठी सरावासाठी येतात. या संकूलाचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रीडा संकुल असे कायमस्वरूपी नामकरण करावे अशी मागणी हाेऊ लागली आहे. त्यासाठी आज (साेमवार) छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे मोठ्या दिमाखात फटाके फाेडत राष्ट्र विकास सेनेच्या शिलेदारांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे क्रीडा संकुल प्रवेशद्वारासमोर अनावरण केले. (sangli latest marathi news)

छत्रपती शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रमाणे दूरदृष्टी असणारे शाहू महाराज यांचा सांगली जिल्ह्यात कुठेही पुतळा किंवा नामकरण नसल्याने छत्रपती शिवाजीराजे यांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये त्यांचे आचार आणि विचारांचे खरे वारसदार असणारे दुसरे राजे म्हणजे राजर्षी शाहू महाराज. आरक्षणाचे जनक व समानता स्थापित करणेसाठी त्यांनी प्रथम मागासवर्गीय व गरीब मुलांसाठी आरक्षण देऊन शिक्षण व्यवस्था सुरू केली.

Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj
IMD ALERT: सावधान! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत उद्या असेल उष्णतेची लाट

या रयतेच्या राजेंचा पुतळा सांगली जिल्ह्यात क्रीडा संकुलाच्या आवारात उभा करून त्यांचा सन्मान करण्याचे काम राष्ट्र विकास सेना करत आहे. हाच पुतळा कायमस्वरूपी व्हावा यासाठी अशी मागणी संस्थेने केली आहे. त्यामुळं कुठल्याही संघटनेने किंवा पक्षाने यास विरोध न करता अगदी सन्मानाने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देऊन समस्त सांगलीकरांच्या वतीने सन्मान करावा असे आवाहन राष्ट्र विकास सेना संस्थेने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj
Sangli: भंगारातील साहित्यातून अर्जुनने बनवली ट्राम गाडी
Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj
FIH Pro League Hockey: टीम इंडियानं काढला जर्मनीचा वचपा; आता इंग्लंडविरुद्ध लढत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com