IMD ALERT: सावधान! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत उद्या असेल उष्णतेची लाट

नागरिकांनी आवश्यकता असेल तर दुपारी घराबाहेर पडावे.
heat wave in maharashtra
heat wave in maharashtrasaam tv

सातारा : राज्यातील बहुतांश भागात नागरिकांना उन्हाचे चटके बसत आहेत. यामुळे नागरिक घरा बाहेर पडताना छत्री, टाेपी, गमछा याचा वापर करु लागले आहेत. राज्यातील मुंबई (mumbai), ठाणे (thane) आणि रायगड (raigad) जिल्ह्यांतील काही भागत आज (रविवारी) उष्णतेच्या लाटेची (heat wave) शक्यता हवामान खात्याने (imd) वर्तवली आहे. (heat wave in maharashtra news)

दरम्यान हवामान खात्याने उद्या (साेमवार) मुंबई, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाटेची शक्यता वर्तवली आहे. याबाबतचे ट्विट पुणे आयएमडीचे (India Meteorological Department) प्रमुख कृष्णानंद हाेसाळीकर यांनी केले आहे.

heat wave in maharashtra
Cristiano Ronaldo Hat-Trick: फुटबॉलमधील जागतिक विक्रम क्रिस्टियानो रोनाल्डोनं मोडला

दरम्यान नागरिकांनी आवश्यकता असेल तर दुपारी घराबाहेर पडावे. जास्ती जास्त पाणी प्यावे. घराबाहेर पडताना पाणी जवळ बाळगावे. उन्हाचे चटके बसू नयेत यासाठी काळे कपडे परिधान करु नये तसेच डाेक्यावर टाेपी अथवा छत्रीचा वापर करावा असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

heat wave in maharashtra
BJP: चांद्यापासून बांद्यापर्यंत फडणवीसांना बजावलेल्या नाेटीसीची हाेळी; भाजप आक्रमक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com