BJP: चांद्यापासून बांद्यापर्यंत फडणवीसांना बजावलेल्या नाेटीसीची हाेळी; भाजप आक्रमक

आज राज्यभरात भाजप कार्यकर्ते आंदाेलन छेडत आहेत.
bjp protest against maharashtra government in sangli
bjp protest against maharashtra government in sanglisaam tv
Published On

मुंबई : पाेलिसांच्या बदली प्रकरणात राज्य सरकारने (maharashtra government) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना नोटीस बजावल्यानंतर सरकारचा आज (रविवार) राज्यातील बहुतांश जिल्ह्यात निषेध नाेंदविला जात आहे. या नाेटीशीच्या प्रतिकात्मक कागदांची होळी राज्यभरातील विविध जिल्ह्यात भाजपकडून (bjp) केली जात आहे. (bjp maharashtra latest marathi news)

मुंबईत आमदार राम कदम (ram kadam) यांच्या कार्यालयाबाहेर आज देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावल्यानंतर सरकारचा निषेध म्हणून महाविकास आघाडी (mva) सरकारचा पुतळा दहन करण्यात येणार होता. मात्र पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतल्याने तेथे भाजप कार्यकर्त्यांनी कागदांची होळी करीत सरकारचा निषेध नाेंदविला. देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या नोटीसची आमदार राम कदम यांनी होळी केली. महाराष्ट्र सरकारचे घोटाळे फडणवीस बाहेर काढत आहेत. याचा राग म्हणून फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. दबावच राजकारण करत आहे तीन मंत्री यांची विकेट गेली अजून मंत्र्यांची विकेट जाईल या भीतीने दबाव आणला जात आहे. महाराष्ट्र सरकार घाबरलेले आहे. वसुली हेच काम त्यांचे सुरू आहे. लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम या नोटीस द्वारे होत असल्याचे राम कदम यांनी नमूद केले.

नाशिकच्या भाजप कार्यालया समोर देखील भाजप नेते आणि कार्यकर्ते यांनी राज्य सरकारचा निषेध नाेंदविला. आमदार देवयानी फरांदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नोटीसीची प्रत जाळत निषेध आंदोलन केले.

अमरावतीत शहर भाजपाच्या वतीने अमरावती शहरातील राजकमल चौकात भाजप नेते व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात भाजप आमदार प्रताप अडसळ, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, प्रवक्ते शिवराय कुळकर्णींसह शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

ठाण्यात देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाेटीसीची होळी केली. ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर भाजपचे आमदार संजय केळकर आणि अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली होळी करण्यात आली. तसेच या वेळी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

भाजपाचे जेष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर पोलीस स्टेशनला निवेदन देत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नाेंदवला.

bjp protest against maharashtra government in sangli
Cristiano Ronaldo Hat-Trick: फुटबॉलमधील जागतिक विक्रम क्रिस्टियानो रोनाल्डोनं मोडला

अकोल्यातील भाजप कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात निदर्शने केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीस यांना बजावलेल्या नोटीसची होळी केली. हे आंदोलन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे येथे राज्य सरकारच्या या नाकामी कृत्याविरोधात आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजप पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी या नोटीसीचे दहन करुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला आहे..

नंदुरबार येथे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी विरोधात आंदोलन केले. नंदुरबार शहरातील नगरपालीका चौकात झालेल्या या आंदोलनात भाजपाने महाविकास आघाडी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या कृतीचा निषेध केला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारचे विविध घोटाळे देवेंद्र फडवणीस पुराव्यानिशी बाहेर काढत असल्याने सरकाचे धाबे दणानले असुन आकासापोटीच त्यांना अशा नोटीसा दिल्या जात असुन त्यांना खोट्या कारवाईत अडकवण्याचा महाराष्ट्र शासनाचा षंडयंत्र असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. या पुढे आणखी तीव्र आंदोलनचा इशारा विजय चौधरी (जिल्हाध्यक्ष) यांनी दिला.

bjp protest against maharashtra government in sangli
Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीस विरुद्ध मविआ सरकार, फडणवीसांना जबाबासाठी पोलिसांची नोटीस

डोंबिवली भाजपतर्फे इंदिरा चौकात भाजप आमदार व कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांना मिळालेल्या नोटिशीची भाजपने जाळून निषेध नोंदवला.

नांदेड येथे आज भाजपच्यावतीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी सुडबुध्दीने बजावलेल्या नोटीसीची होळी करण्यात आली. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत नोटीसीचा निषेध केला. भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना नोटीस बजावून सरकार सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रविण साले (महानगराध्यक्ष, भाजप) यांनी म्हटलं. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

चंद्रपुरात भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वात गांधी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. नोटीसची प्रत जाळून या कारवाईचा निषेध करण्यात आला. "दुर्योधन आणि दु:शासन देखील म्हणत असतील, महाविकास आघाडी सरकार हमारा बाप है" अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली. घोटाळा शोधून काढणाऱ्या विरोधीपक्ष नेत्याला चौकशीच्या फे-यात अडकवल्याबद्दल भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला. घोटाळेबाजांना वाचवणा-या सरकार विरोधात रस्त्यावर उतरून निकराचा संघर्ष करण्याची भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारने आपले घोटाळे अशाच पद्धतीने लपवण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप भाजपने केला.

उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमून भाजपच्या कार्यकर्त्यांनी या नोटीसीची होळी करत बोंबमारो आंदोलन केले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवित जोरदार घोषणाबाजी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

bjp protest against maharashtra government in sangli
World Cup: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात झुलन गोस्वामीनं 'या' विश्वविक्रमाशी केली बरोबरी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com