DAP Fertilizer Saam tv
ऍग्रो वन

DAP Fertilizer : ऐन पेरणीच्या हंगामात डीएपी खताचा तुटवडा; जालन्यात मागणीपेक्षा पुरवठा कमीच

Jalna News : खरीप हंगाम सुरु होत असताना बहुतांश शेतकरी हे खतांचा भरणा करून ठेवत असतात. यंदा डीएपी खताचा पुरवठा मागणीपेक्षा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना डीएपी खताच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: खरीप हंगाम सुरु होत आहे. यामुळे काही शेतकऱ्यांकडून पीक पेरणीला सुरवात करण्यात आली आहे. तर बागायतदार शेतकऱ्यांकडून उन्हाळ्यात लागवड करण्यात आली आहे. आगामी काळात पिकांना खत देण्याच्या अनुषंगाने खतांचा भरणा करत आहेत. मात्र जालन्यात ऐन पेरणीच्या हंगामात डीएपी खताचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे होत आहे.

खरीप हंगाम सुरु होत असताना बहुतांश शेतकरी हे खतांचा भरणा करून ठेवत असतात. प्रामुख्याने युरिया, डीएपी या खतांना अधिक मागणी असते. मात्र यंदा डीएपी खताचा पुरवठा हा मागणीपेक्षा कमी झाल्यामुळे पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना डीएपी खताच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. खरीप पेरणी दरम्यान शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खतांचा कुठलाही तुटवडा जाणवणार नाही; असं वारंवार कृषी विभाग सांगत होतं मात्र सध्या जिल्ह्यामध्ये डीएपी खताचा तुटवडा जाणवत आहे. 

डीएपीचा पुरवठाच कमी 

यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून युरिया, डीएपी, एमओपी एनपीके, एसएसपी या खताची दोन लाख ७७ हजार ७१० मॅट्रिक टन इतकी मागणी करण्यात आली होती. मागणीप्रमाणे खताचा पुरवठा देखील करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यामध्ये डीएपी खताचा पुरवठा मागणीपेक्षा कमी झाल्याने तुटवडा जाणवत आहे. 

बियाणे विक्री करणाऱ्या चार दुकानांवर बंदी
रत्नागिरी
: रत्नागिरी जिल्ह्यातील काही दुकानदारांनी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची बियाणी विक्री करत नसल्यामुळे कृषी विभागाच्या वतीने कारवाईचा बडगाव उचलण्यात सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चार दुकानांना १ लाख २२ हजार ६४ रुपये किमतीच्या बियाणे विक्री करण्यास बंदी घातली आहे. यात साधारण ७१६ किलो बियाण्यांची विक्री थांबवण्यात आली आहे. त्यामुळे बियाणे खते विक्री दुकानदारांचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT