Washim : चार महिन्यांपासून वेतन थकले; स्त्री रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा निर्णय

Washim News : कंत्राटी कर्मचारी भरण्याचा ठेका हा सक्षम फॅसिलिटीज प्रा. लि. या कंपनीला देण्यात आला आहे. काही कर्मचारी चार वर्षांपासून अविरतपणे सेवा बजावत आहेत. मात्र चार महिनांपासून कर्मचाऱ्यांना वेतन नाही
Washim News
Washim NewsSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिमच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात गेल्या चार वर्षांपासून प्रामाणिक सेवा देणाऱ्या सक्षम फॅसेलीटीज प्रा. लि. अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यांपासून वेतन थकले आहे. तसेच मागील दोन वर्षांपासून बोनसही मिळाला नसल्याने आर्थिक अडचणींना कंटाळून कर्मचाऱ्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर घोषणाबाजी करत आज पासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

वाशिमच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. कंत्राटी कर्मचारी भरण्याचा ठेका हा सक्षम फॅसिलिटीज प्रा. लि. या कंपनीला देण्यात आला आहे. यात काही कर्मचारी हे चार वर्षांपासून अविरतपणे सेवा बजावत आहेत. मात्र चार महिनांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही. वेतनाबाबत कर्मचाऱ्यांनी वारंवार मागणी केली. मात्र वेतन अद्याप मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. 

Washim News
Akkalkuwa : पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; संस्था चालकांचा बेजाबदारपणा, ७० विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबून २०० किलोमीटरचा प्रवास

वाशीम जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना वगळले 
बुलढाणा, अकोला, अमरावती यासारख्या जिल्ह्यांमध्ये या कंपनीचे वेतन दिलं गेलं आहे. फक्त वाशिमच्या कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं आहे. यामुळे कर्मचारी संतप्त झाले असून वेतन मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. यात आरोग्य सेवा विस्कळीत झाली; तर त्याची संपूर्ण जबाबदारी सक्षम फॅसेलीटीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांची राहील असे कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.

Washim News
Kalyan : कल्याणमध्ये खुलेआम अवैध रेती उपसा; खाडीतून वाळू माफियांकडून सर्रास उत्खनन

वेतन मिळेपर्यंत बेमुदत संपाचा निर्णय

जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून यात स्त्री रुग्णालयातील आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मुळात स्त्री रुग्णालयात इमर्जन्सी केस येत असतात. अशावेळी कर्मचारी उपलब्ध नसल्याने काही दुर्घटना घडण्याची देखील शक्यता आहे. मुख्य म्हणजे वेतन मिळेपर्यंत बेमुदत संपाचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com