Kalyan : कल्याणमध्ये खुलेआम अवैध रेती उपसा; खाडीतून वाळू माफियांकडून सर्रास उत्खनन

Kalyan News : नदीतील वाळू उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू माफियांकडून नदीतून उत्खनन करत वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: न्यायालयाने याआधीच राज्यभरातील रेती उत्खननावर कठोर निर्बंध लावले असून अनधिकृत उत्खनन बंदीचे आदेश लागू आहेत. मात्र कल्याण रेतीबंदर परिसरात परवानगी न घेता अधिकृतपणे मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरू आहे. यामुळे खाडी पात्राचा ऱ्हास, पर्यावरणाचे नुकसान अशा गंभीर समस्या उभ्या राहत आहेत. वाळू माफिया प्रशासनाला देखील जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. 

नदीतील वाळू उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू माफियांकडून नदीतून उत्खनन करत वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशाच प्रकारे कल्याण पश्चिम परिसरातील रेतीबंदर आणि दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात खाडीतून खुलेआम रेती उपसली जात असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अगदी दिवसा देखील सुरु आहे.  

Kalyan News
Lightning Strike : पाऊस सुरु झाल्याने झाडाच्या आश्रयाला गेले; वीज कडाडली अन् होत्याचे नव्हते झाले, तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

बोटींमधून आणली जाते रेती 

दरम्यान रेती माफियांच्या बोटींनी सतत ये- जा करत रेतीबंदर व खाडीतून उत्खनन करत आहेत. विशेष म्हणजे ही रेती खाडीच्या काठावर साठवली जाते आणि नंतर मोठ्या ट्रकद्वारे शहरात पोहोचवली जाते. कल्याण तालुक्यात सुरू असलेल्या चाळी आणि इमारतींच्या कामांमध्ये ही रेती वापरली जाते. अर्थात बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने रेतीचा उपसा हा अविरतपणे सुरु आहे. 

Kalyan News
Akkalkuwa : पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; संस्था चालकांचा बेजाबदारपणा, ७० विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबून २०० किलोमीटरचा प्रवास

न्यायालयाचे आदेश धाब्यावर 

महसूल प्रशासनाकडून काही प्रमाणात कारवाई करण्यात येत असते. मात्र प्रशासनाच्या होणाऱ्या या दिखाऊ कारवाईवर नाराजी व्यक्त केली जात आहे. न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून सुरू असलेला हा उपसा थांबवण्यासाठी तत्काळ कारवाई आणि कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिका कडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com