Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

Jalgaon News : मागील काही हंगामात शेतात सततची नापिकी येत होती. यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज फेड करू शकत नसल्याने त्यातून वाढत जाणाऱ्या कर्जामुळे समाधान धनगर मागील काही दिवसांपासून विवंचनेत

Rajesh Sonwane

जळगाव : सततची नापिकी व वाढत जाणारा कर्जाचा बोझा यातून आलेल्या नैराश्याला कंटाळून कंडारी येथील तरुण शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली. राहत्या घरात कीटकनाशक सेवन केल्याने त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. 

समाधान एकनाथ धनगर (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. (Jalgaon News) समाधान धनगर हे शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मागील काही हंगामात शेतात सततची नापिकी येत होती. यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज फेड करू शकत नसल्याने त्यातून वाढत जाणाऱ्या कर्जामुळे समाधान धनगर मागील काही दिवसांपासून विवंचनेत होते. कर्जाच्या तणावात असताना त्यांनी रविवारी रात्री आठला त्यांनी (Farmer) कीटकनाशक सेवन केले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. 

सदरची बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांना खासगी वाहनातून जळगाव शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना रात्री नऊला त्यांचा मृत्यू झाला. याबाबत जळगाव शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मृताच्या मागे आई कमलबाई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : महायुतीने घेतला कांद्याचा धसका! निर्यात शुल्कात पुन्हा कपात

Mayavati News : ...तर बहुजन समाज पक्ष सरकारमध्ये सामील होणार; माजी मुख्यमंत्री मायावतींनी मोठे संकेत

Shrigonda Vidhan Sabha : राहुल जगताप यांचे पक्षातून निलंबन; बंडखोरी केल्याने शरद पवार गटाची कारवाई

Vande Bharat food : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये देण्यात आलेल्या सांबारात किडे तरंगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, या ठिकाणी घडली घटना

Solapur Politics : सोलापुरात शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT