Nandurbar Heavy Rain : सलग दोन दिवस अतिवृष्टी; हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे मातीमोल झाला आहे
Nandurbar Heavy Rain
Nandurbar Heavy Rain Saam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने आणि दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. सलग तीन ते चार दिवस पिके पाण्याखाली असल्याने पिके खराब होण्यास सुरुवात झाली आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असून प्रशासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात करावी; अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Nandurbar Heavy Rain
Virchakra Dam : नंदुरबारचा पाणी प्रश्न मिटला; वीरचक्र धरण भरले, १६ गावांना सतर्कतेचा इशारा

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे मातीमोल झाला आहे. जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे केळी, पपई, मिरची, कापूस, सोयाबीन, ज्वारी या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेती शिवाराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेतात साचलेले हे पाणी लवकर कमी होणार नसल्याने शेतकऱ्यांचे (Farmer) यात प्रचंड नुकसान झाले आहे. 

Nandurbar Heavy Rain
Cidco Lottery 2024 : नवी मुंबईत मिळणार हक्काचं घर, तब्बल 902 घरांसाठी सिडकोची सोडत, असा करा अर्ज

आता घोषणा नको, मदत द्या 

प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात यावे. सरकार देते ती मदत कमी आहे. पंचनामे करून शेतकऱ्याने केलेल्या उत्पादन खर्च इतकी मदत करावी. सरकार फक्त घोषणा करतो, पंचनामे करते मात्र मदत करताना आखडता हात घेत असल्याची तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com