Virchakra Dam : नंदुरबारचा पाणी प्रश्न मिटला; वीरचक्र धरण भरले, १६ गावांना सतर्कतेचा इशारा

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी, नाल्यांना पाणी आले आहे
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे वीरचक धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी शिवण नदी इथली भरून वाहत आहे. 

Nandurbar News
Beed News : हरणाची शिकार करणारे चारजण ताब्यात; बीडच्या केज तालुक्यात मोठी कारवाई

नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यात मागील दोन दिवस मुसळधार (Rain) पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी, नाल्यांना पाणी आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने नंदुरबारच्या विरचक धरण हे खाली होते. मात्र आता वीरचक्र धरण पूर्ण भरले असून धरणाचे तीनही दरवाजे १५ सेंटीमीटरने वर उचलण्यात आले आहे. यामुळे शिवण नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्याने शिवन नदीकाठच्या १६ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 

Nandurbar News
Beed News : आई व पत्नीची साथ मिळत नाही..असे ठेवले व्हाटसअप स्टेटस; बेपत्ता झालेल्या शिक्षकाचा आढळला मृतदेह

पाणी टंचाईचा प्रश्न मिटला 

नंदुरबार शहरवासीयांना मोठ्या प्रमाणात पाणी कपातीचे संकट होते. नंदुरबार शहराला तब्बल तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. मात्र आता धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नंदुरबारकरांवरचे पाणी टंचाईचे संकट देखील संपणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com