Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon : अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका; गिरणा नदीच्या पुरात हजारो झाडे जमीनदोस्त, शेतकरी संकटात

Jalgaon News : जळगाव जिल्हा भारताचे केळीचे बास्केट म्हणून ओळखला जातो. येथील केळीची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. मात्र नैसर्गिक संकटामुळे केळीची गुणवत्ता घटल्यास निर्यातीत अडचणी येण्याची शक्यता आहे.

संजय महाजन

जळगाव : प्रसिद्ध असलेली जळगावची केळी या वर्षी पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या संकटात सापडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून गिरणा नदीला आलेल्या पूराचे पाणी शेतात घुसल्याने शेकडो केळीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. तयार झालेली केळीची घड मातीत पडून नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

नवरात्र उत्सवात उपवासात मोठ्या प्रमाणावर मागणी असणारी केळी यावर्षी शेतातच पडून नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांचे हाल अधिकच वाढले आहेत. केळीला देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी असते. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी शेतात केळीचे पीक घेतात. मात्र जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हेच पीक आता त्यांच्या डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

परिपक्व केळीचे घड मातीत 

जळगाव तालुक्यातील देवगावसह जिल्ह्यातील विविध भागात गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. यामुळे केळीचे अनेक उभे खांब जमिनीवर पडले आहेत. या झाडांवरील तयार घड मातीत पुरल्याने ते सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावेळी दिव्यांग केळी उत्पादक शेतकऱ्याचे अश्रु अनावर झाले असून नुकसान मिळाली नाही, तर मी गिरणा नदीत उडी घेवून जिव देणार असल्याची केली हताश भावना व्यक्त केली.

नुकसान होऊनही पंचनामे बाकी 
दरवर्षी येत असलेले अस्मानी संकट शेतकऱ्यांच्या पाठीशी लागलेले असते. यावर्षी देखील केळीच्या शेतात पाणी साचल्यामुळे पुन्हा मोठी हानी झाली आहे. नुकसान झाल्यानंतर देखील पंचनाम्यासाठी अद्याप कुठलेही प्रशासकीय अधिकारी फिरकलेले नाही. हीच खरी खंत असल्याची भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी, राज्यात भूकरमापक संवर्गातील ९०३ पदांची भरती, कसा अर्ज कराल? जाणून घ्या

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शिर्डी साईबाबा संस्थानाची अतिवृष्टीसाठी ५ कोटींची मदत; न्यायालयाची ‘गुप्त’ परवानगीही आवश्यक, कारण? VIDEO

Navratri 2025: नवरात्रीत या घरामध्ये कन्यापूजन करू नये?

Eknath Shinde: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही; एकनाथ शिंदे यांचं आश्वासन|VIDEO

SCROLL FOR NEXT