Pimpri chinchwad : शेअर मार्केटच्या नावाखाली ६४ लाखात फसवणूक; टोळी पोलिसांच्या ताब्यात

Pimpri Chinchwad News : आरोपींकडे असलेल्या मोबाईल क्रमांकावर आणि बँक अकाऊंट संदर्भात जवळपास १० फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात उघडकीस आला आहे
Pimpri Chinchwad News
Pimpri Chinchwad NewsSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीवर ८ ते २५ टक्के नफा मिळवून देतो; असे सांगत फसवणूक करण्यात येत होती. अशाच प्रकारे सोशल मीडियावरून लिंक पाठवून खाजगी कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीची जवळपास ६३ लाख ९५ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. या फसवणूक करणाऱ्या टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. 

सायबर गुन्हेगारीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष देत फसवणूक केली जात असते. फसवणुकीच्या या घटना सातत्याने घडत असून पिंपरी चिंचवडमध्ये अशीच घटना समोर आली आहे. यात एकाची ६३ लाख ९५ हजार रुपयात फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

Pimpri Chinchwad News
Ahilyanagar : पालकमंत्र्यांच्या दालनाबाहेर जागरण गोंधळ; ओला दुष्काळ, कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक

बँक खात्यांवरून १ कोटींचा अपहार 
या प्रकरणाता पिंपरी चिंचवड शहर सायबर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. प्रथमेश शिवाजी भुसे, सचिन राधाकिशन मोरे अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडे असलेल्या मोबाईल क्रमांकावर आणि बँक अकाऊंट संदर्भात जवळपास १० फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तांत्रिक तपासात उघडकीस आल आहे. त्यांच्या बँक खात्यावर वेगवेगळ्या राज्यात १ कोटी १५ लाख ८५ हजार ७८९ रुपयांचा अपहार झाल्याचे ही पोलिस तपासात समोर आले आहे.

Pimpri Chinchwad News
Amravati : अमरावती शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक; मतदार नोंदणीला सुरवात, राजकीय पक्षांची लगबग

मेट्रोची तांब्याचा वायर चोरणाऱ्या चोरटा ताब्यात 

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात महा मेट्रोची तांब्याचा वायर चोरणाऱ्या चोराला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी उत्तर प्रदेश राज्यात जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. दिलशाद शमशाद अन्सारी (वय ३४) या आरोपीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक एक पथकाने उत्तर प्रदेश राज्यातील बागपत जिल्ह्यात जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. दिलशाद अन्सारी याने पुणे शहरात कोथरूड आणि पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथे मेट्रोच्या खांबावर चढून जवळपास दोन लाख रुपये किमतीची तांब्याची वायर चोरी केल्याच पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com