Ahilyanagar : पालकमंत्र्यांच्या दालनाबाहेर जागरण गोंधळ; ओला दुष्काळ, कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक

Ahilyanagar News : मुसळधार पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून मदतीची अपेक्षा आहे. मात्र सरकारकडून निर्णय घेतला जात असल्याने संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले
Ahilyanagar News
Ahilyanagar NewsSaam tv
Published On

सुशील थोरात 
अहिल्यानगर
: अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीत सरकारने कोणतेही निकष न लावता पूरग्रस्तांना भरघोस मदत करावी, हेक्टरी किमान १ लाख रुपयांची मदत, गुराढोरांना बाजारभावानुसार नुकसान भरपाई तसेच शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली असून या मागणीसाठी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या दालनाबाहेर जागरण गोंधळ आंदोलन केले.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाभयंकर पूरस्थिती निर्माण झाली असून ग्रामीण भाग, शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. गावे पाण्याखाली गेली, जनावरे व गुरेढोरे मृत्युमुखी पडली आहेत. इतकेच नाही तर घरदार, संसारोपयोगी साहित्य तसेच मुलांचे शैक्षणिक साहित्य यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे शेतकर्‍यांची जगण्याची उमेद संपुष्टात आली असून येणार्‍या काळात आत्महत्यांचा धोका निर्माण झाला आहे. 

Ahilyanagar News
Farmer Rasta Roko : पैठण- संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; ओला दुष्काळ जाहिर करत सरसकट मोबदला देण्याची मागणी

निकष न लावता मदत करा 

या भीषण परिस्थितीत सरकारने कोणतेही निकष न लावता तिजोरी खुली करून पूरग्रस्तांना भरघोस मदत करावी. तसेच शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करावी; अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. त्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी प्रश्नावर जागरण गोंधळ आंदोलन छेडले आहे. सरकारने पुढील दोन दिवसांत योग्य ती उपाययोजना केली नाही तर मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर गोंधळ घालण्याचा इशारा आंदोलनादरम्यान संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी दिला आहे

Ahilyanagar News
Maval : पाच किलोमीटरची पायपीट थांबली; नवरात्र उत्सवात सावित्रीच्या लेकींचा सायकल देऊन सन्मान

शेतकऱ्यांनी अडविली भाजप आमदाराची गाडी
नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारड या ठिकाणी नायगाव मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राजेश पवार हे मुदखेडकडे जात होते. या वेळेस शेतकऱ्याने त्यांच्या गाडीला घेराव घातला. आमदार पवार गाडीत बसून जात असतानाची शेतकऱ्याना माहिती मिळताच गाडी आडवून शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारला. तात्काळ कर्जमाफी करावी अशी मागणी केली. पुढच्या वेळेस सरकारमधील कोणत्याही आमदाराची गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com