Amravati : अमरावती शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक; मतदार नोंदणीला सुरवात, राजकीय पक्षांची लगबग

Amravati News : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दरवेळेस नव्याने मतदार यादी तयार करण्यात येत असते. त्यानुसार आजपासून याची मतदार नोंदणी सुरु झाली असून पुढील तीन महिने नोंदणी
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: अमरावती शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक होत आहे. पुढील वर्षी नोव्हेंबर २०२६ या महिन्यात निवडणूक होणार असून आतापासून निवडणुकीसाठीची चुरस पाहण्यास मिळत आहे. दरम्यान आज पासून मतदार नोंदणीला सुरवात झाली आहे. मतदारांची अधिकाधिक नोंदणी व्हावी; यासाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात निवडणुकीची लगबग सध्या सुरू झालेली आहे. विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने नवीन निवडणुकीसाठी मतदार यादीची प्रक्रिया आज पासून सुरू झाली आहे. मतदार वाढविण्यासाठी राजकीय पक्ष देखील कामाला लागल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

Amravati News
Maval : पाच किलोमीटरची पायपीट थांबली; नवरात्र उत्सवात सावित्रीच्या लेकींचा सायकल देऊन सन्मान

दरवेळी नवी मतदार यादी 

सन २०२० च्या निवडणुकीत ३५ हजार ६२२ मतदार होते. त्यावेळी ८६.७३ टक्के इतके मतदान झाले होते. तर यावेळी मतदार यादी नव्याने तयार करण्यात येणार असल्याने अधिकाधिक नोंदणीसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दरवेळेस नव्याने मतदार यादी तयार करण्यात येत असते. त्यानुसार आजपासून याची मतदार नोंदणी सुरु झाली असून पुढील तीन महिने नोंदणी सुरु असेल. 

Amravati News
Ahilyanagar : पालकमंत्र्यांच्या दालनाबाहेर जागरण गोंधळ; ओला दुष्काळ, कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक

३० डिसेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम यादी 

तीन महिने मतदार नोंदणी केली जाणार असून अधिकाधिक मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांचा असेल. दरम्यान ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निवडणुकीत उमेदवारांना मतदारांद्वारा पसंतीक्रम देण्यात येतो. मतदार नोंदणी करताना गठ्ठा अर्ज मान्य नसणार आहे; अशी माहिती अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांनी दिली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com