Rasta Roko Aandolan, Chhatrapati Sambhaji Nagar News, vaijapur gangapur highway saam tv
ऍग्रो वन

Chhatrapati Sambhaji Nagar News : कांद्याला एक रुपया भाव... शेतकरी आक्रमक, राेखला वैजापूर गंगापूर महामार्ग (पाहा व्हिडिओ)

विंचूर प्रकाशा राज्य मार्गावर देखील आज शेतकरी कांद्याच्या भावासाठी रस्त्यावर उतरले हाेते.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhaji Nagar News : कांद्याला एक रुपया भाव मिळाल्याने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर येथील शेतकरी संतापले. या शेतक-यांनी वैजापूर गंगापूर महामार्ग (vaijapur gangapur highway) राेखला. त्यामुळे महामार्गावरील वाहतुक खाेळंबली. (Maharashtra News)

गंगापूर बाजार समितीत आज (मंगळवार) कांद्याची एक रूपयाने खरेदी केली गेली. आधीच अवकाळीने मेटाकुटीला आलेला शेतकरी आता कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज झाला. दरम्यान काही शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडला. त्यानंतर सर्व शेतकरी संघटीत झाले. त्यांनी वैजापूर गंगापूर महामार्ग (vaijapur gangapur highway) राेखून धरला. कांद्याला भाव मिळावा यासाठी रास्ताे राेकाे आंदाेलन केल्याचे शेतक-यांनी नमूद केले.

नाशकातही शेतकरी आक्रमक

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील करंजाड उपबाजार समितीत व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. दुस-या व्यापा-यांना कांदा मार्केटमध्ये उतरू देत नसल्याने शेतकरी संतप्त झाले. विंचूर प्रकाशा राज्य मार्गावरील रस्त्यावर उतरत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA car accident : बुलढाण्यात आमदाराच्या कारचा भीषण अपघात, २५ वर्षाचा तरूण कोमात

Navratri Rules: नवरात्रीत कांदा-लसूण का खाऊ नये? जाणून घ्या कारण

चिकन खाल्लं, बेसीन धुण्यावरून राडा; MPSC करणाऱ्या मुलींची हाणामारी, ४ जणींनी रूम पार्टनरला भींतीवर आदळून चोपलं

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Momos Recipe: मैदा नाही तर गव्हापासून बनवा पौष्टिक मोमोज, सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT