Soyabean Crop Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Crop : ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवरील अळीचा प्रादुर्भाव कमी होईना; शेतकरी चिंताग्रस्त

Dharashiv News : सध्या हे पिक फुलोरा, शेंगा लागणे व शेंगा पक्वतेच्या महत्वाच्या अवस्थेत आहे. असे असताना गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली असली तरी सातत्याने ढगाळ वातावरण कायम आहे

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : यंदा पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर पाऊस सुरूच आहे. मध्यंतरी पाऊस थांबला होता. या कालावधीत पिके चांगल्या प्रकारे तरारली होती. दरम्यान मागील पंधरा- वीस दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे पिकांवर रोगराई पडण्यास सुरवात झाली. यात सोयाबीन पिकांवर आळीचा प्रादुर्भाव वाढला असून फवारणी केल्यानंतर देखील प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. 

धाराशिवच्या (Dharashiv News) भुम तालुक्यात यंदा खरीप हंगामात पेरणी क्षेत्राच्या जवळपास ८० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली. सध्या हे पिक फुलोरा, शेंगा लागणे व शेंगा पक्वतेच्या महत्वाच्या अवस्थेत आहे. असे असताना गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली असली तरी सातत्याने ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे (Soyabean Crop) सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर अळ्यांनी हल्ला केला आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 

अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी फवारणी करत आहेत. मात्र तरीही अळ्यांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी (Farmer) हतबल झाला आहे. महागडी औषधी घेऊन फवारणी केल्यानंतर देखील फायदा होत नसल्याने खर्चात भर पडत आहे. यात उत्पादन घटण्याची  शक्यता अधिक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज उल्हासनगरमध्ये ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT