Beed News Saam tv
ऍग्रो वन

Beed News : शेतकऱ्यांना दिलासा; बागायतीसह फळबागांनाही मिळणार नुकसान भरपाई, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण

Beed News : १६ ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे २ हजार ३०३ शेतकऱ्यांची रब्बी ज्वारी, कापूस कांदा, तूर, झेंडू, हरभरा या पिकांचे तर फळ पिकात, द्राक्षे, सीताफळ, शेवगा या पिकांचे नुकसान झाले

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात चार दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ११ पैकी ७ तालुक्यामध्ये (Beed) नुकसान झाले आहे. या ७ तालुक्यातील तब्बल ६९ गावातील २ हजार ३०३ शेतकऱ्यांच्या २ हजार ६७७ एक्कर शेतामधील (Farmer) पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये ३३ टक्क्यांच्या खाली ७ तालुक्यांत १६०६.२५ एक्करवरील क्षेत्राचे नुकसान झाले असून ३३ टक्क्यांपेक्षा जास्त १०७१.०५ एक्कर क्षेत्रावर नुकसान आहे. (Latest Marathi News)

बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यासह आष्टी, गेवराई, धारूर, वडवणी अंबाजोगाई, केज या ७ तालुक्यांतील ६९ गावांत १६ ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान झालेल्या अवकाळी (Rain) पावसामुळे २ हजार ३०३ शेतकऱ्यांची रब्बी ज्वारी, कापूस कांदा, तूर, झेंडू, हरभरा या पिकांचे तर फळ पिकात, द्राक्षे, सीताफळ, शेवगा या पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचे संकट असताना आता ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटे अळी, तुरीवर शेंगा पोखरणारी अळी, ज्वारीवर चिकटा तर गव्हाची वाढ खुंटली आहे. हे दुसरे नैसर्गिक संकट ओढावले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशी मिळणार मदत 

या नुकसानग्रस्त ६९ गावांतील पीक नुकसानीचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांनी पूर्ण केले असून आज कृषी विभागाला अहवाल प्राप्त झाला. दरम्यान एनडीआरएफच्या निकषानुसार ज्या शेतकऱ्यांचे एक हेक्टरमधील जिरायती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना ८ हजार ५०० रुपयांची मदत, बागायती क्षेत्रातील एक हेक्टर क्षेत्रासाठी १७ हजार रुपये तर फळपिकासाठी एका हेक्टरला २२ हजार ५०० रुपये मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT