Jayakwadi Dam : जायकवाडीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध; जलसमाधी घेण्याचा दिला इशारा

Ahmednagar News : केंद्र सरकारच्या अधिन असलेल्या नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन लिमिटेडला मराठवाड्यातील जायकवाडी धरण जलाशयात तरंगते सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाचे प्रस्ताव देण्यात आले आहेत
Jaykwadi Dam
Jaykwadi DamSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

नेवासा (अहमदनगर) : जायकवाडी जलाशयातील नियोजित तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावे या मागणीसाठी कहार भोई आणि भिल्ल समाजाचे शेकडो मच्छीमार (Ahmednagar) अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. हा प्रकल्प रद्द न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा मच्छीमारांनी दिला आहे. (Maharashtra News)

Jaykwadi Dam
Sudhir Mungantiwar News : मराठा आरक्षण देण्याची सरकारची भुमिका संदेह कोणी घेऊ नये; मंत्री सुधीर मुनगंटीवार

केंद्र सरकारच्या अधिन असलेल्या नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन लिमिटेडला मराठवाड्यातील जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) जलाशयात तरंगते सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. हा सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यास २३ हजाराहून अधिक मच्छीमारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार (Nevasa) असल्याची भिती या जलाशयावर अवलंबून असलेल्या मच्छीमारांना आहे. तसेच या प्रकल्पामुळे जायकवाडी जलाशयामध्ये असलेले सर्व माशे ऑक्सिजन विना मरण पावतील अशी देखील भीति असल्याने सरकारने तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा अशी मागणी केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jaykwadi Dam
Parbhani Crime: अपघात घडवून ४ लाखांची रोकड लंपास; पूर्णा- नांदेड रस्त्यावर भरदिवसाची घटना

जलसमाधीचा इशारा 

जायकवाडीतील सदरचा प्रकल्प रद्द न झाल्यास सर्व मच्छीमार जलसमाधी घेतल्याशिवाय राहणार नाही; अशी भूमिका भिल्ल भोई आणि कहार समाजाच्या मच्छीमारांनी घेतली आहे. शेकडो मच्छीमार आजपासून नेवासा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com