Parbhani Crime: अपघात घडवून ४ लाखांची रोकड लंपास; पूर्णा- नांदेड रस्त्यावर भरदिवसाची घटना

Parbhani News : पूर्णा तालुक्यात परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेसह पूर्णा शहर, चुडाया, लोखंडे पिंपळा, कावलगांव, ताडकळस आदी ठिकाणी शाखा आहेत. चुडावा येथील शाखेत शेतकऱ्यांचे पिक विम्याचे अनुदान वाटप सुरू आहे
Parbhani Crime
Parbhani CrimeSaam tv
Published On

परभणी : पूर्णा तालुक्यातील चुडावा येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेची रोकड घेऊन जाणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर (Parbhani) पाळत ठेवून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येथून जोरदार धडक देत अपघात (Accident) घडवला. यानंतर त्यांच्याजवळील चार लाख रुपयांची रोकड घेऊन पसार झाल्याची घटना आज सकाळी घडली. (Breaking Marathi News)

Parbhani Crime
Dhule Fraud Case : बनावट कागदपत्रे करून प्रॉपर्टी विक्री; टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी घेतले ताब्यात

पूर्णा- नांदेड रस्त्यावरील गौर शिवारात ही घटना सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. घटनेत बँकेचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले असून चुडावा पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली असल्याची माहिती आहे. पूर्णा तालुक्यात परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Bank) मुख्य शाखेसह पूर्णा शहर, चुडाया, लोखंडे पिंपळा, कावलगांव, ताडकळस आदी ठिकाणी शाखा आहेत. चुडावा येथील शाखेत शेतकऱ्यांचे पिक विम्याचे अनुदान वाटप सुरू आहे. दरम्यान आज  सकाळी बँकेची रोकड संपल्याने येथील शाखा व्यवस्थापक बळीराम सखाराम हानवते व शिपाई शिवराम श्यामराव गायकवाड हे दोघे शहरातील मोंढा बाजारातील मुख्य शाखेतून चार लाख रुपयांची रोकड घेऊन दुचाकीने चुडावा शाखेकडे निघाले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Parbhani Crime
Sudhir Mungantiwar News : मराठा आरक्षण देण्याची सरकारची भुमिका संदेह कोणी घेऊ नये; मंत्री सुधीर मुनगंटीवार

दरम्यान त्यांच्या पाळतीवर असलेल्या दोन चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. पूर्णा- नांदेड रस्त्यावर गौर शिवारात त्यांची दुचाकी जात असताना पाठीमागून दुचाकीवरून येऊन जोरदार धडक देत अपघात घडवला. यात दुचाकीवरील बँकेचे दोन्ही कर्मचारी खाली पडून गंभीर जखमी झाले. याचवेळी त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेत चार लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी हिसकावून धनगरटाकळी फाट्यावरून दुचाकीवरून पसार झाले. जखमींनी घटनेची माहिती बँक प्रशासन व पोलीसांना दिली. घटनास्थळी येत जखमी कर्मचाऱ्याना उपचारासाठी नांदेड येथे पाठविले. चुडावा पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली असून तपास चुडावा पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com