Farmer Rasta Roko Saam tv
ऍग्रो वन

Farmer Rasta Roko : दूध दरासाठी शेतकरी आक्रमक; रास्ता रोको करत दिला सरकारला इशारा

Ahmednagar news : एकीकडे दूध दरावरून शेतकरी आक्रमक झाले असताना दुसरीकडे केंद्र सरकारने १० हजार टन दूध पावडर आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहमदनगर) : दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून आज अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार- घोटी राजमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दुधाला किमान ४० रुपये दर करावा अशी मागणी केली.

एकीकडे दूध (Milk) दरावरून शेतकरी आक्रमक झाले असताना दुसरीकडे केंद्र सरकारने १० हजार टन दूध पावडर आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे. हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मिट चोळण्याचा प्रकार असल्याचे म्हणत शेतकऱ्यांनी या निर्णयाचा निषेध केला. सरकारने आगोदर राज्यातील दूध भेसळ रोखवी अशी मागणी शेतकऱ्यांनी (Farmer) केली. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात उद्या दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी न बोलावता केवळ शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्याना निमंत्रित करण्यात आल्याने ही बैठक आम्हाला मान्य नाही; अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

तर मंत्रालयात शेण ओतून आंदोलन 

दुधाला ४० रुपये दर (Milk Price) अपेक्षित असताना २२ ते २५ रुपये दर मिळतो. हा सरकारने टाकलेला दरोडा आहे; असा आरोप शेतकऱ्यांनी केला. मागण्या मान्य झाल्या नाही तर सर्व सरकारी कार्यालयांसह मंत्रालयात शेण ओतून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू; असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Egg Palak Curry: घरीच बनवा ढाबा स्टाईल चवदार अंडा पालक करी

सावधान! नवरा- बायकोने एकमेकांचा टॉवेल वापरू नये, होऊ शकतात त्वचेच्या गंभीर समस्या

Mahalaxmi Rajyog: मंगळ चंद्रासोबत युती करून बनवणार खास योग; 'या' राशींवर पडणार पैशांच पाऊस

Mangalsutra Designs: लग्नसराईसाठी नविन मंगळसूत्र खरेदी करायचंय? मग ही पारंपारिक आणि ट्रेंडी डिझाईन आहेत परफेक्ट चॉईस

Maharashtra Live News Update: रिक्षा आणि खासगी वाहन चालकांचा सुटकेचा श्वास; सीएनजी गॅस सुरू

SCROLL FOR NEXT