Hingoli News : कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी रोखला हिंगोली- वाशिम राष्ट्रीय महामार्ग; शासन दखल घेत नसल्याने आक्रमक भूमिका

Hingoli News : पाच दिवसांपासून आंदोलन सुरु असताना कोणत्याही प्रकारची दखल शासन स्तरावरून घेण्यात येत नाही. यामुळे आंदोलनातील हा पुढचा टप्पा आज करण्यात आला
Hingoli Rasta Roko
Hingoli Rasta RokoSaam tv
Published On

हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावात गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेत नसल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हिंगोली- वाशिम राष्ट्रीय महामार्ग रोखत रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.  

Hingoli Rasta Roko
Sambhajinagar News : दोन एकर क्षेत्रावरील मिरचीचे पीक फेकले उपटून; पाऊस नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू आहे. दरम्यान पाच दिवसांपासून आंदोलन सुरु असताना कोणत्याही प्रकारची दखल शासन स्तरावरून घेण्यात येत नाही. यामुळे आंदोलनातील हा पुढचा टप्पा आज करण्यात आला. (Farmer) शेतकऱ्यांच्या या रास्ता रोको आंदोलनामुळे कनेरगावजवळ महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली असून शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटून देत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.  

Hingoli Rasta Roko
Solapur Water Supply: सात दिवसांत १२५ टँकर बंद; अद्यापही सोलापूर जिल्ह्यातील ७८ गावे तहानलेलीच

दुबार पेरणीचे संकट व कर्जही मिळेना 

दरम्यान जिल्ह्यात शेतकऱ्यांवर पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, अनेक बँकांनी पीक कर्ज देण्यास नकार दिला आहे. त्यात बँकेकडून कर्ज वसुलीची मोहीम सुरू आहे. त्यामुळे बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com