परभणी : सोयाबीनला सुरवातीला पाच हजाराच्यावर भाव मिळाला होता. यामुळे आणखी भाव वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. यामुळे (Farmer) शेतकऱ्यांनी वेयर हाऊसमध्ये सोयाबीनची साठवणूक (Parbhani) केली. मात्र सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरात १ हजार ते १२०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Latest Marathi News)
परभणी जिल्ह्यात जवळपास दोन लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली गेली. गेल्या वर्षी अतिवृष्टीने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व बाजारात आवक कमी झाल्याने सोयाबीन विक्रमी दहा हजाराचा भावाने विकले गेले. यावर्षी (Soyabean Price) सोयाबीनला जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सुरुवातीला ५१०० ते ५२०० रुपये भाव मिळाला. शेतकऱ्यांनी ह्या भावाने आपले सोयाबीन वेयर हाउसमध्ये ठेवले. शेतकऱ्यांना वाटले की भाव वाढेल ह्या आशेवर सोयाबीन वेयर हाउसमध्ये ठेवत त्यावर कर्ज घेतले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दर घसरल्याने वेयर हाऊसकडून नोटीस
दरम्यान आता बाजारात सोयाबीन १००० ते १२०० रुपयाने खाली आल्याने साडेचार हजार प्रतिक्विंटल रुपये भाव झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी वेयर हाउसमध्ये सोयाबीन ठेवत कर्ज घेतले आहे. अश्या शेतकऱ्यांना वेयर हाउसने नोटीस देत पैसे परत करा किंवा तुमच्या सोयाबीनचा आजच्या ४१००- ४२०० रुपये प्रतिक्विंटलने लिलाव करून आमचे पैसे जमा करू; अश्या आशयाची नोटीस दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.