Buldana Crime: अर्रर्र! हळदीच्या कार्यक्रमाला आली अन् नवरीचे दागिने घेऊन पळाली; ६ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News: एका लग्न समारंभात हळदीसाठी आलेल्या महिलेने नवरीचे दागिनेच पळवलेत. महिलेने हळदीचा कार्यक्रमातून नवरीच्या दागिण्यांची बॅग लंपास केली आहे. १३ तोळे सोन्याचे दागिने आणि २ मोबाईल असा एकूण ६ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल या पर्समध्ये होता.
Buldana Crime
Buldana CrimeSaam TV
Published On

संजय जाधव

Buldana Crime News:

बुलढाणा शहरात चोरांचा मोठा सुळसुळाट सुटला आहे. सातत्याने येथे चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशात एका लग्न समारंभात हळदीसाठी आलेल्या महिलेने नवरीचे दागिनेच पळवलेत. महिलेने हळदीचा कार्यक्रमातून नवरीच्या दागिन्यांची बॅग लंपास केली आहे.

Buldana Crime
Buldhana Crime News : बुलढाण्यात पाेलिसांची माेठी कामगिरी, बनावट नोटांसह चार अटकेत; 14 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त

घटनेबाबत अधिक महिती अशी की, बुलढाणा शहरातील हॉटेल बुलढाणा रेसिडेन्सी येथे लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी वधूसाठी आणलेल्या सोन्याच्या दागिन्यांची पर्स एका ठिकाणी ठेवली होती. अज्ञात महिलेने या पर्सवर पाळत ठेवून पर्ससकट दागिने लंपास केलेत.

१३ तोळे सोन्याचे दागिने आणि २ मोबाईल असा एकूण ६ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल या पर्समध्ये होता. वधूची आई जया खरात यांनी बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

बुलढाण्यातील संग्रामपूरमध्ये देखील पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणातील आरोपींवर कारवाई केली आहे. संग्रामपूर तालुक्यात चोरीच्या प्रमाणात अधिकच वाढ झाल्याने तामगाव पोलीस अधिक अलर्ट मोडवर आले आहेत. नुकतेच तामगांव पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणात विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

दुचाकी चोरी करणाऱ्या एका भामट्या चोराला पोलिसांना पकडण्यात यश आले असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयात आरोपीला दोन दिवसांचा पोलीस कोठडी मिळाली आहे. आरोपी दत्तात्रय मनोहर वेरूळकार रा. धामणगावं गोतमारे याने दोन मोटारसायकल चोरी केल्याची स्वतः कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी सह २ दुचाकी असा १ लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून विविध कलमानुसार आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे.

Buldana Crime
Mumbai Cyber Crime: सायबर सिटीत सायबर गुन्ह्यांची स्थिती काय? खुद्द पोलीस आयुक्तांनीच दिली माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com