संजय सूर्यवंशी
नांदेड : नांदेडच्या कंधार तालुक्यातील एका उच्च शिक्षित तरुणाने आपल्या शेतात गुणकारी खपली गव्हाची (Nanded) लागवड केली. या गव्हाला बाजारात मोठी मागणी आहे. मधुमेह, हाडांचे आजार यासह इतर आजारांवर खपली गहू रामबाण इलाज असल्याचा दावा या तरुण (Farmer) शेतकऱ्याने केला आहे. (Live Marathi News)
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील सूजानवाडी येथील कृष्णा भालेराव या तरुण शेतकऱ्याचे बीएस्सी ऍग्रीपर्यंत शिक्षण झालं आहे. कृष्णा भालेराव याने आपल्या ३ एकर शेतीमध्ये खपली गव्हाची (Wheat) लागवड केली. सेंद्रिय पद्धतीने गव्हाची लागवड करून त्याचे योग्य पद्धतीने नियोजन केले. सध्या गहू चांगल्या स्थितीत असून ४५ ते ५० क्विंटल गव्हाचे उत्पादन होण्याची अपेक्षा भालेराव यांना आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
साडेतीन लाख निव्वड नफ्याची अपेक्षा
खपली गव्हाला बाजारात मोठी मागणी असते. इतकेच नाही तर १० हजार रुपये प्रति क्विंटल दर या गव्हाला मिळतो. खर्च वगळता साडेतीन लाख रुपये निवळ नफा या गव्हाच्या उत्पादनातून मिळणार असल्याचे कृष्णा भालेराव यांनी सांगितले. इतर शेतकऱ्यांनी देखील आपल्या शेतात असे वेगवेगळे प्रयोग करून आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी; असे आवाहन देखील या उच्च शिक्षित तरुणाने केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.