BJP NCP Banner War : भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवली; आता राष्ट्रवादीने १ लाखाचे बक्षीस द्यावं

Nandurbar News : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने तळोदा शहरात भाजप नेत्यांवर झालेल्या ईडी कारवाईची माहिती द्या आणि लाख रुपये बक्षीस मिळवा; अशा आशयाची फलकबाजी करण्यात आली होती
BJP NCP Banner War
BJP NCP Banner WarSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदूरबार : आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरु असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने (Taloda) तळोदा शहरात भाजप नेत्यांवर झालेल्या ईडी कारवाईची माहिती द्या आणि लाख रुपये बक्षीस मिळवा; असे फलक लावले. याला उत्तर म्हणून भाजप (BJP) नेत्यावर सुरु असलेल्या ईडी कारवाईसंदर्भाचे फलक लावत राष्ट्रवादीने १ लाखाचे बक्षीस देण्याबाबत फलक लावले. (Maharashtra News)

BJP NCP Banner War
Jayant Patil News : सर्व समाजांना आरक्षणावरून खेळवले जातेय; जयंत पाटील यांची टीका

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला होता. यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने तळोदा शहरात भाजप नेत्यांवर (Nandurbar) झालेल्या ईडी कारवाईची माहिती द्या आणि लाख रुपये बक्षीस मिळवा; अशा आशयाची फलकबाजी करण्यात आली होती. याच फलकाची दखल भाजपने घेतली असून भाजप नेत्यांवरही ईडी आणि सीबीआयच्या चौकशी चालू असलेल्या नेत्यांचे नावासकट फोटो बॅनरवर लावले आहे. भाजप नेत्यांवर देखील कारवाई करण्यात आली होती; असं प्रत्युत्तर भाजपच्या वतीने (NCP) राष्ट्रवादी शरद पवार गटाला देण्यात आला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

BJP NCP Banner War
Wardha News : दारूबंदी जिल्ह्यात दारू पुरवली तर बारमालकांचे परवाने होणार रद्द; २५ बारचे परवाने रद्दबाबत प्रस्ताव

राष्ट्रवादीने भाजपवर लावलेल्या या खोट्या आरोप आम्ही उघडीच आणले आहे, अशा आशयाचे फलक लावत ता भाजपच्या वतीने तळोदा शहरात लावण्यात आलेले आहे. आम्ही भाजप नेत्यांवरील कारवाईची माहिती दिली असून राष्ट्रवादीने भाजपला लाख रुपये देऊन आपला शब्द पाडावा; असे फलक तळोदा शहरात लावण्यात आलं असून या फलकाची जिल्हाभरात चर्चा होत आहे. यात फलकबाजीवरून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप समोरासमोर आल्याचं चित्र तळोदा शहरात पहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com