अजय सोनवणे
येवला (नाशिक) : शेतात काबाडकष्ट करत शेतकरी उत्पन्न घेत असतात. अर्थात पारंपरिक शेती करत निसर्गाच्या लहरीपणात जितके उत्पन्न मिळेल; ते घेत असतात. मात्र काहीजण याला अपवाद ठरतात. पारंपरिक शेती न करता काहीतरी वेगळा प्रयोग करत चांगले उत्पन्न घेत असतात. त्यानुसार येवला येथील मॅकेनिकल इंजिनिअर असलेल्या तरुणाने घरातच मशरूमची शेती करत चांगले उत्पन्न घेतले आहे.
पारंपारिक शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने नाशिकच्या येवला तालूक्यातील पिंपरी येथील मुकुंद कुदळ या मॅकेनिअल इंजिनीअर तरुणाने मशरूम शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. मुकुंद कुदळ या तरुणाने युट्यूबवर मशरुम शेतीची माहिती घेतली. यानंतर आपल्या घरातील १० बाय १० च्या रुममध्ये कमी खर्चात मशरूम पिकवले. अवघ्या तीन महिन्यात त्याला उत्पादन सुरु होऊन त्यातून त्याला आर्थिक उत्पन्न सुरु झाले आहे.
दुष्काळग्रस्त असलेल्या येवला तालुक्यातील पिंपरी येथील युवा शेतकरी मुकुंद कुदळ या मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या तरुणाने घरातील छोट्याशा रूममध्ये १० हजार रुपये पेक्षाही कमी खर्चात मशरूमची शेती सुरुवात केली आहे. अवघ्या ३ महिन्यात या शेतकऱ्याला मशरूमचे उत्पादन देखील सुरू झाले आहे. यातून त्याला आर्थिक उत्पन्न मिळायला देखील सुरुवात झाली आहे. अर्थात इंजिनिअर तरुणाने केलेला हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
नाशिक, मुंबईमधून मशरूमची मागणी
घराच्या १० बाय १० या छोट्याशा रूममध्ये मशरूमचे उत्पादन घेत असून काढणीला सुरवात झाली आहे. सध्या येवल्याच्या स्थानिक बाजारपेठेत तसेच नाशिक व मुंबई येथे मशरूम विकली जात आहे. आता पुढील टप्प्यात शेडनेटमध्ये मोठ्या प्रमाणावर मशरूमची शेती करत एक्स्पोर्ट क्वालिटीचे मशरूम तयार करण्याचा त्याचा मानस मुकुंद याने बोलताना व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.