Nylon Manja : नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई; अकोल्यात तिघांना दंड तर नागपूरमध्ये एकजण ताब्यात

Akola Nagpur News : मकरसंक्रांती पुढील महिन्यात असल्याने आतापासूनच पतंग व मांजा विक्रीसाठी बाजारात दाखल झाला आहे. या चायनीज मांजामुळे दरवर्षी दुर्घटना घडत असतात. यात काहीजण जखमी झाले आहेत. तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.
Nylon Manja
Nylon ManjaSaam tv
Published On

अक्षय गवळी/ पराग ढोबळे 

अकोला/ नागपूर : मकरसंक्रांती असल्याने बाजारात सध्या पतंग व त्यासाठी लागणार नायलॉन मांजा विक्रीसाठी दाखल झाला आहे. अर्थात हा नायलॉन मांजा विक्रीस व वापरावर बंदी असताना देखील सर्रासपणे विक्री केली जात आहे. अशाच प्रकारे मांजा विक्री करणाऱ्यावर अकोला व नागपूरमध्ये कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मांजा जप्त करत दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे.

मकरसंक्रांती पुढील महिन्यात असल्याने आतापासूनच पतंग व मांजा विक्रीसाठी बाजारात दाखल झाला आहे. या चायनीज मांजामुळे दरवर्षी दुर्घटना घडत असतात. यात काहीजण जखमी झाले आहेत. तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. यामुळे हा नायलॉन मांजा वापरावर बंदी करण्यात आली आहे. तरी देखील मांजा विक्री होत असून त्याचा वापर देखील करण्यात येत आहे. अकोला व नागपूरमध्ये झालेल्या कारवाईवरून हे पाहण्यास मिळत आहे. 

Nylon Manja
Nanded Crime News : पत्नीला नांदायला न पाठवल्याने संपवले सासूला, खूनी जावयाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अकोल्यात तीन जणांना दंड 

अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये पतंग उडविण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक, नायलॉन, सिंथेटिक मांजामुळे नागरिकांना, लहान मुलांना, तसेच पक्ष्यांना होणारी इजा व अपघात टाळण्यासाठी मनपाने मोहीम हाती घेतली आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशानुसार शहरात मनपाच्या पथकांकडून मांजा विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात येत आहेय. यात आज मांजा विक्री करणाऱ्या तिन जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात प्रत्येकी १३ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली..

Nylon Manja
Leopard Attack : शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; शेतमजुरांची पळापळ

नागपूरमध्ये पावणेपाच लाखाचा मांजा जप्त 

नागपूर : मकर संक्रांत जवळ येताच मोठ्या प्रमाणात नायलॉन माजा विकला जातो. जास्त पैसे मिळवण्यासाठी लोकांसाठी जीवघेणा ठरणार मांजा विकला जात असतो. नागपूरमध्ये अशा प्रकारे मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. कळमना पोलिसांनी जीवघेणा नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर कारवाई केली. यात एकाला अटक करत ४ लाख ७५ हजार रुपयाचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com