- अजय सोनवणे
Nashik News : नाशिक जिल्हयातील कांद्याची बाजारपेठ असलेली लासलगाव बाजार समिती तब्बल १२ दिवस दिवाळी निमित्ताने बंद राहणार आहे. दरम्यान या बंदमुळे बाजार समितीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. (Maharashtra News)
दिवाळी निमित्ताने व्यापारी लिलावात सहभागी होणार नाही असे पत्र बाजार समितीच्या (apmc) सचिवांना व्यापा-यांनी दिले आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून अठरा तारखेपर्यंत करण्यात येणार असल्याचे बाजार समितीच्या सचिवांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.
या बंद मुळे बाजार शेतक-यांची कोंडी होणार आहे. शिल्लक कांदा विकून दिवाळी साजरी करता येईल अशी शेतक-यांना अपेक्षा होती. ऐन सणाच्या काळात बाजार समिती बंद राहणार असल्याने शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या बंद मुळे बाजार समितीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.