Beed News : शेतक-यांनाे ! दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी 'हे' करा; जाणून घ्या बीड कृषी विभागाचा माैल्यवान सल्ला

शेतक-यांनी वेळाेवेळी कृषी विभागाचा सल्ला घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
beed
beedsaam tv
Published On: 

Beed News : पावसाळा तोंडावर आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व घरगुती सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करणे गरजेचे आहे. अन्यथा घरगुती बियाणे पेरणी योग्य नसल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. (Maharashtra News)

beed
Kagal Bandh : कागल शहरात कडकडीत बंद, टिपू सुलतानचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी एकास अटक (पाहा व्हिडिओ)

गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व घरगुती सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासून घेतली नव्हती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. अशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून उगवण क्षमता तपासूनच पेरणी करणे गरजेचे आहे. घरगुती सोयाबीन बियाणाची 70 टक्क्यापेक्षा अधिक उगवण क्षमता असल्यास घरगुती बियाणे पेरणीसाठी योग्य आहे.

beed
Parner Bandh : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पाेस्ट, युवकास ग्रामस्थांनी चाेपले; पारनेर बंद

जर 70 टक्क्यांपेक्षा कमी उगवण क्षमता असल्यास प्रत्येकी एक टक्का कमी उगवण क्षमतेसाठी अर्धा किलो जास्तीचे घरगुती बियाणे वापरावे असे आवाहन बीड जिल्हा कृषी विभागातर्फे शेतक-यांना करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.