Parner Bandh : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पाेस्ट, युवकास ग्रामस्थांनी चाेपले; पारनेर बंद

पारनेर पोलिसांकडून शांततेचं आवाहन केले गेले आहे.
parner bandh, hindutvavadi sanghatana
parner bandh, hindutvavadi sanghatanasaam tv
Published On

- सुशील थोरात

Nagar News : पारनेर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करून महाराष्ट्राची व छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्याबद्दल हिंदूत्ववादी संघटनेने (hindutvavadi sanghatana) आज (साेमवार) पारनेर तालुक्यात बंदचे (parner bandh) आवाहन केले. त्यास तालुक्यात प्रतिसाद मिळाला आहे. पारनेर येथे व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभागी हाेत हिंदुत्ववादी संघटनेस पाठींबा दिला आहे. (Maharashtra News)

parner bandh, hindutvavadi sanghatana
Jacobin Cuckoo In Sangli : पावसाचा सांगावा घेऊन आफ्रिकन पाहुणा पाेहचला कृष्णाकाठी

पारनेर तालुक्यातील पाबळ गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करून महाराष्ट्राची व छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्याने ग्रामस्थांनी वसीम सय्यद या युवकास ग्रामस्थांनी चाेप दिला. ग्रामस्थांच्या आक्रमकतेनंतर पाेलिसांनी सय्यद याच्यावर गुन्हा नाेंदविला.

parner bandh, hindutvavadi sanghatana
Ashadi Ekadashi 2023 : टाळ मृदुंगाच्या गजरात भाविकांची पंढरपूरात गर्दी वाढू लागली, ऊन वारा पावसापासूनच्या संरक्षणासाठी पत्रा शेडची उभारणी

दरम्यान या घटनेच्या निषेर्धात हिंदूत्ववादी संघटनेकडून आज (साेमवार) पारनेर तालुक्यात बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळपासूनच पारनेर तालुक्यातील विविध गाव शांततेत बंद ठेवण्यात आले आहे. पारनेर पोलिसांकडून खबरदारीच्या सूचना आणि कारवाईचा इशारा देण्यात आला होता. परमेश्वरासह पारनेर तालुक्यात पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे.

parner bandh, hindutvavadi sanghatana
Satara Collector Transfer: सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीमागे राजकारण ? साेमवारी महामाेर्चा

आक्षेपार्ह पोस्टचा निषेधार्थ संपूर्ण पारनेरच्या व्यावसायिकांनी दुकानं बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीची पोस्ट करणाऱ्या युवकावर कठोर कारवाई व्हावी तसेच पुढील काळात महापुरुषांची बदनामी होणार नाही यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून कठोर कारवाई करावी अशी मागणी पारनेर येथील युवकांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com