Jacobin Cuckoo In Sangli : पावसाचा सांगावा घेऊन आफ्रिकन पाहुणा पाेहचला कृष्णाकाठी

Chatak Pakshi : पर्यटक अनुभवणार सुरांची रानमैफल.
Chatak Bird, Sangli
Chatak Bird, Sanglisaam tv
Published On

Sangli News : आभाळाकडे डोळे लाऊन बसलेल्या शेतकऱ्यांना पाऊस येणार असल्याची वर्दी निसर्गातील पक्षांकडून मिळत असते. कुळीव कुळीव म्हणणारी कोकीळा, शेतकऱ्यांना पेरते व्हा अशी साद घालणारा पावशा हे नेहमीच बळीराजाला पावसाच्या आगमनासाठी सज्ज ठेवत असतात. त्याचबरोबर आणखी एक पाहूणा उशीरा का होईना आज थेट आफ्रिकेतून पावसाचा सांगावा घेऊन सांगलीच्या (sangli) कृष्णाकाठावर दाखल झाला आहे. (Maharashtra News)

Chatak Bird, Sangli
Kagal Bandh : कागल शहरात कडकडीत बंद, टिपू सुलतानचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी एकास अटक (पाहा व्हिडिओ)

हा पाहूणा म्हणजे चातक. काळ्या पांढऱ्या चातकाच्या डोक्यावर एखाद्या राजकुमाराच्या डोक्यावर शोभावा असा काळा तुरा असतो. त्याचा साळुंकी एवढा आकार, लांब शेपूट, शरीराचा वरील सर्व भाग काळ्या रंगाचा असतो.

हनुवटी, मान व पोटाचा भाग पांढरा असतो. पंखांवर रुंद पांढरा पट्टा असल्यामुळे उडतानाही हा चातक पक्षी सहज ओळखतो. हा चातक पक्षी सध्या (sangli) पलुस तालुक्यातील कृष्णाकाठावर दाखल झाला आहे.

Chatak Bird, Sangli
MP Ramdas Athawale News : हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात : रामदास आठवले (पाहा व्हिडिओ)

कोकीळा, पावशा, कारूण्य कोकीळा, बुलबुल, रॉबीन या गाणा-या पक्षांसोबतच चातकाच्या सुरांची रानमैफल कृष्णाकाठावर रंगते आहे. तर या चातक पक्षाचा मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजे संपूर्ण पावसाळ्यात राहणार आहे. कृष्णाकाठ आमणापूर येथील नागोबा कट्टा परिसरात २ चातक पहायला मिळाल्याची माहिती पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली.

Chatak Bird, Sangli
Ashadi Ekadashi 2023 : टाळ मृदुंगाच्या गजरात भाविकांची पंढरपूरात गर्दी वाढू लागली, ऊन वारा पावसापासूनच्या संरक्षणासाठी पत्रा शेडची उभारणी

चातकाची वीण जूनपासून ऑगस्टपर्यंत होते. मीलन काळात हे पक्षी खूप गोंगाट करतात. कोकिळेप्रमाणे याही पक्ष्यात भ्रूण परजीविता दिसून येते. मादी आपली अंडी छोट्या सातभाई पक्ष्याच्या घरट्यात घालते.

सातभाई हा लहान पक्षी असल्यामुळे भिऊन घरट्यातून पळून जातो व काही आडकाठी न येता तिला सातभाईच्या घरट्यात अंडे घालता येते. अंड्याचा रंग सातभाईच्या अंड्याप्रमाणेच आकाशी असतो. सप्टेंबरच्या सुमारास सातभाईची पिले अंड्यांतून बाहेर येतात. त्यामध्येच चातकाचे पिल्लू असते असे नाझरे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com