Dhule News: ट्रकमध्‍ये दगड भरून केले वजन; कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक, व्यापाऱ्यास दिला चोप

ट्रकमध्‍ये दगड भरून केले वजन; कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक, व्यापाऱ्यास दिला चोप
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On: 

धुळे : धुळ्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करणं एका व्यापाऱ्यास चांगलंच महागात पडल आहे. कारण धुळ्यातील विविध ठिकाणातून शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत असताना या शेतकऱ्यांची फसवणूक सर्रासपणे करण्यात येत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर या व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी चांगलाच चोप दिला आहे. (Tajya Batmya)

Dhule News
Solapur Crime News: धक्कादायक प्रकार..कौटुंबिक वाद विकोपाला, नवऱ्याने पत्नीचा कानच उपटून काढला

धुळे तालुक्यातील लामकनी परिसरामध्ये व्यापाऱ्यातर्फे कापूस खरेदी केला जात आहे. कापसासह वाहनाचे वजन करण्यापूर्वी या व्यापाऱ्यातर्फे रिकाम्या वाहनाचे वजन करीत असताना रिकाम्या वाहनाचे वजन वाढविण्यासाठी या व्यापाऱ्याने शक्कल लढवली होती. या वाहनामध्ये जवळपास दोन ते तीन क्विंटल दगड भरून वाहनाचे वजन करण्यात आले. त्यानंतर कापूस भरण्यासाठी शेताकडे जात असताना रस्त्यात या व्यापाऱ्याने गाडीत भरलेले दगड फेकून दिले.

Dhule News
Latur News: बाळंतपणात समोर आला धक्‍कादायक प्रकार, पतीसह सासर, माहेरच्‍यांवर गुन्‍हा

दगड फेकताना दिसले

गाडीतून दगडफेकत असताना परिसरातील शेतकऱ्यांच्या हे लक्षात आल्यानंतर या शेतकऱ्याने ज्या शेतकऱ्याच्या शेतात कापूस भरण्यासाठी व्यापारी जात होता. त्या शेतकऱ्यास या बाबतची माहिती दिली. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने व परिसरातील शेतकऱ्यांनी फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यास काठीने चांगलाच चोप देऊन अद्दल घडवली आहे.

Dhule News
Solapur Bribe Trap: तीन हजाराची लाच पडली महागात; एक्साइजच्या निरीक्षकासह तीन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

एकीकडे हवामान बदलाचा फटका सहन करून त्याचबरोबर पिकावरील रोगराई, या सर्व परिस्थितीला तोंड देऊन पिकवलेल्या पिकाला बाजारात कवडीमोल दर मिळत आहे. मनावर दगड ठेवून आपलं पीक कवडीमोल दरात व्यापाऱ्यास देताना व्यापाऱ्यांच्या फसवणुकीला देखील या शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यापुढे अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करताना या व्यापाऱ्याला घडवलेली अद्दल या व्यापाऱ्यास व यासारख्या इतर व्यापाऱ्यांना चांगलीच लक्षात राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.