

सोलापूर : नवीन आर्थिक वर्षासाठी बार अँड रेस्टॉरंटच्या स्टॉक रजिस्टर आणि ब्रँड रजिस्टरवर शिक्के मारण्यासाठी तीन हजारांची लाच (Bribe) घेताना एक्साइजच्या निरीक्षकासह तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. निरीक्षक संभाजी साहेबराव फडतरे, कॉन्स्टेबल प्रियंका बबन कुटे, सहा.दुय्यम निरीक्षक सिद्धाराम अंदेनप्पा बिराजदार असे राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांची नावे आहेत. (Latest Marathi News)
तक्रारदार यांचे बार अँड रेस्टॉरंट असून त्याच्या स्टॉक रजिस्टर आणि ब्रँड रजिस्टरमध्ये नवीन आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने (Solapur News) राज्य उत्पादन शुल्क विभागातून शिक्के मारून घेण्यासाठी (प्रमाणित करण्यासाठी) विभागातील महिला जवान प्रियांका कुटे आणि बिराजदार यांनी स्वतःसाठी आणि साहेबांसाठी चार हजारांची लाचेची मागणी केली.
दरम्यान निरीक्षक फडतरे यांनी सदर लाच रकमेमध्ये तडजोड करून तीन हजार रुपये रक्कम कुटे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये कुटे यांनी लाचेची रक्कम स्वीकारली. याप्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर विभागाने केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.