Latur News: बाळंतपणात समोर आला धक्‍कादायक प्रकार, पतीसह सासर, माहेरच्‍यांवर गुन्‍हा

बाळंतपणात समोर आला धक्‍कादायक प्रकार, पतीसह सासर, माहेरच्‍यांवर गुन्‍हा
Latur News Child Marriage
Latur News Child MarriageSaam tv
Published On

लातूर : अल्पवयीन मुलीशी विवाह करणे पतीसह सासर आणि माहेरकडील लोकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. (Child Marriage) बालविवाह पहिल्या बाळांतपणात उघडा पडला आहे. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने पतीवर बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत तर सासर आणि माहेरकडील (Latur News) नातेवाईकांवर बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये औसा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Latur News Child Marriage
Jalgaon News: पत्‍नीच्‍या मृत्‍यूने होता तणावात; विरहात पुलावरून मारली उडी

औसा तालुक्यातील बुधोडा येथील १६ वर्षे ११ महिने वयाच्या एका मुलीचा विवाह २६ डिसेंबर २०२१ ला उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील तरुणाशी करुन दिला होता. वर्षभरानंतर सदर मुलगी गर्भवती राहिली. पहिल्या बाळांतपणासाठी ती बुधोडा येथे माहेरी आली. पोट दुखु लागल्यामुळे तिला ६ मार्च २०२३ रोजी लातूरातील लेबर कॉलनी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिला मुलगी झाली. यावेळी डॉक्टरांच्या तपासणी दरम्यान तिचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे आणि तिचा बालविवाह झाल्याचे निदर्शनास आले.

Latur News Child Marriage
Latur News: लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर अत्‍याचार; पोलिसांत गुन्हा दाखल

पोलिसात गुन्‍हा दाखल

तातडीने याची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली. या माहितीच्या आधारे तिच्या वयाची अधीक चौकशी केल्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे स्पष्‍ट झाले. या संदर्भात औसा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी कल्पना सूर्यवंशी यांनी सदर मुलीचा पती, मुलीची आई, मुलीचे सासू सासरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पिडीत अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्याशी विवाह करुन शारिरिक संबंध ठेवल्या प्रकरणी पती विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर पिडीत मुलीची आई, तिची सासू आणि सासऱ्या विरोधात बाल विवाह प्रतिबंध अधिनयमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com