Beetal Goat: बीटल शेळी मिळवून देते Maximum नफा; दूध आणि मांसासाठी आहे भारी

Beetal Goat: या शेळीची प्रमुख विशेषता म्हणजे ही शेळी दूध उत्पादनासह मांसाहारासाठी उत्तम आहे. या शेळीच्या चामड्यापासून बनलेल्या वस्तूंना बाजारात मोठी मागणी आहे.
Beetal Goat: बीटल शेळी मिळवून देते Maximum नफा; दूध आणि मांसासाठी आहे भारी
Beetal Goat

भारत देशातील मोठ्या प्रमाणात लोक हे शेतीसोबत पशुपालन करुन आपले उत्पन्न वाढवत असतात. यात सर्वात कमी खर्चात सुरू केलं जाणारं पशूपालनातील प्रकार म्हणजे 'शेळीपालन'. पण शेळीपालन करण्याआधी शेतकऱ्यांनी प्राणी तज्ज्ञांचा हा सल्ला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. योग्यपद्धतीने शेळीपालन केलं तर आपला आर्थिक नुकसान न होता आपल्याला अधिक नफा होत असतो. कमी पावसाच्या प्रदेशात निकृष्ट चाऱ्यावर तग धरून शेळ्या उत्तम प्रकारे स्वतःचे संगोपन करत असतात. त्यामुळे शेळीपालन कोणत्याही शेतकऱ्याला परवडणारा जोडव्यवसाय आहे.

शेळीपालन करताना जर सुधारित जातीच्या शेळींच्या जातीचे संगोपन केलं तर आधिक फायदा होत असतो. आज आपण अशाच एका शेळीच्या प्रजातीविषयी जाणून घेणार आहोत, जी आपल्याला भरपूर नफा मिळवून देते. ही शेळीची जात आहे, बीटल शेळी. बीटल जातीची शेळी ही प्रगत जातीची शेळी मानली जाते. या शेळ्यांची दूध उत्पादन क्षमता जास्त असते.

या शेळ्या दूधासह मांसाहारासाठी चांगल्या असतात. तसेच या शेळीच्या चामड्यापासून बनलेल्या वस्तूंना बाजारात मोठी मागणी आहे. या शेळीचे चामडे उच्च गुणवत्ता असलेले आहे. ही शेळी भारतातील पंजाब आणि हरियाणा राज्यात आढळते. पंजाबच्या अमृतसर, गुरदासपुर आणि फिरोजपुर या जिल्ह्यात आढळते. या शेळ्यांना अमृतसरी बकरी या नावाने ही शेळी ओळखली जाते.

बीटल शेळी कशी ओळखाल

बीटल जातीची शेळी इतर शेळ्यांपेक्षा खूप वेगळी असते. तिच्या लांब पायांसह, तिचे कानही लांब आणि लटकलेले असतात. शेळीची शेपटी लहान आणि पातळ असते. शेळीला शिंग असून ते पाठीमागे वळलेली असतात. तसेच या जातीच्या प्रौढ शेळीचे वजन ५० ते ६० किलो असते आणि शरीराची लांबी ८६ सेमी असते. मादीचे वजन ४० ते ५० किलो तर बोडकाचे वजन ५० ते ८० किलो असते. एका वेतात ही शेळी ५ ते ७ लिटरपर्यंत दूध देत असते.

ही शेळी दिवसाला २ते ३ लीटर दूध देत असते. स्तनपान करवताना ती १.५ ते १.९ लिटर दूध तयार करते. सामान्य जनावरांप्रमाणे ही शेळी चार खाणे पसंत करते. या शेळीची किमत २० ते २५ हजार रुपयांना ही शेळी विकली जाते.

Beetal Goat: बीटल शेळी मिळवून देते Maximum नफा; दूध आणि मांसासाठी आहे भारी
Latur Water Scarcity : लातूर जिल्ह्यातील ८ पैकी ४ मध्यम प्रकल्प कोरडे; शेती सिंचनासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com