Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार; मुलगी थोडक्यात बचावली

Jalgaon News : हतनूर धरणाच्या बॅकवॉटर भागात मधुकर पाटील यांचे घर आहे. जवळच पाणी असल्याने या भागात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे.
Leopard Attack
Leopard AttackSaam tv
Published On

जळगाव : रावेर तालुक्यात भामलवाडी परिसरात बिबट्याने दुसऱ्यांदा हल्ला केल्याची घटना घडली आहे. (Jalgaon) दरम्यान रात्रीच्या सुमारास मधुकर हरी पाटील यांच्या घरी बिबट्याने हल्ला (Leopard Attack) करीत शेळीला ठार केले. तर या घटनेत शेळीजवळ असलेली मुलगी थोडक्यात बचावली आहे. (Maharashtra News)

Leopard Attack
Ashok Chavan News : ते विधान चुकीचे व हास्यास्पद; राहुल गांधी यांच्या विधानावर अशोक चव्हाण यांचे उत्तर

हतनूर धरणाच्या (Hatnur Dam) बॅकवॉटर भागात मधुकर पाटील यांचे घर आहे. जवळच पाणी असल्याने या भागात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. याच दरम्यान या भागात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. भामलवाडी (ता. रावेर) परिसरात सात ते आठ दिवसांपासून बिबट्या गावात आणि गावाबाहेर रात्रीच्या वेळेस फिरत असल्याचे निदर्शनास दिसून आले आहे. यापुर्वी बिबट्याने गणेश गोपाळ कोळी यांची एक गाय वाड्यामधून फस्त केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भर गावात येऊन मधुकर पाटील.यांची शेळी ठार केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leopard Attack
Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत गावात राजकीय नेत्यांना बंदी; बंदीचे बॅनर लावून एकत्र येत घेतली शपथ

सायंकाळच्या दरम्यान बिबट्या गावात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. सदर घटनेनंतर वन विभागाचे पथक, पोलीस अधिकाऱ्यांची या भागात गस्त वाढली आहे. मात्र दहशतीमुळे रात्री गावातील कोणीही बाहेर पडत नाही. हतनूर जलाशयाचे बॅक वॉटर चे पाणी गावाच्या अवती भोवती असल्याने अशा हिंसक प्राण्यांना उन्हाळ्यात सोयीची जागा उपलब्ध होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com