संजय सूर्यवंशी
नांदेड : मराठा आरक्षण आंदोलन आता अजून तीव्र होताना दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला वारंवार वेळ देऊनही त्यांची आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही. यामुळे (Nanded) आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश नाही. बंदीचे बॅनर लावून गावकऱ्यांनी तशी शपथ घेतली आहे. (Tajya Batmya)
मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) समाजाचा लढा अजूनही सुरु आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर देखील समाजाने आपल्या आरक्षणाचा लढा सुरूच ठेवला आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील पळसगाव, टाकळगाव या गावातील सकल मराठा समाजाने एकत्र येत (OBC) ओबीसींतून आरक्षण मिळणार नाही; तो पर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत राजकीय नेत्यांना गावात बंदी घालण्यात आली आहे. अशी शपथ घेण्यात आली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ग्रामसभेतच घेतला निर्णय
विधानसभा आणि लोकसभेतील बहुतांश आमदार आणि खासदार हे मराठा समाजाचे असल्याने ते मराठा आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेऊ शकत नाहीत. गावात येण्यास सर्व नेत्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टाकळगाव, पळसगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत नेत्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने गावात येऊ नये, असे ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावकऱ्यांनी घेतली शपथ घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.