Viral Video: गिफ्ट न दिल्याने पिसाळली बकरी; टक्कर देत सांता क्लॉजला पाडलं खाली, फनी VIDEO

Funny Viral Video: ख्रिसमस म्हणजे लाल रंगाच्या ड्रेसमध्ये असणारा सांताक्लॉज. ख्रिसमसमध्ये सांताक्लॉजचे महत्त्व वाढते.
Funny Viral Video
Funny Viral VideoSaam Digital
Published On

Santa Claus Viral Video

ख्रिसमस होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. पाश्चात्य देशात ख्रिसमस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भारतीयही पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत असतात. ख्रिसमसमध्ये समारंभांचे आयोजन घरोघरी तसेच ऑफिसमध्ये देखील केले जाते. सध्या सोशल मीडियावर एका सांता क्लॉज़चा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे..('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Funny Viral Video
Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये धक्का लागल्याने महिलांमध्ये दे दणादण; तोंडावर चापट आणि बेदम बुक्क्या; फ्रीस्टाईल हाणामारी VIDEOपाहा

ख्रिसमस म्हणजे लाल रंगाच्या ड्रेसमध्ये असणारा सांताक्लॉज. ख्रिसमसमध्ये सांताक्लॉजचे महत्त्व वाढते. प्रत्येक लहान मुलांना सांताक्लॉजकडून मिळणाऱ्या भेटवस्तूची अपेक्षा असते तसचे अनेक ऑफिसेसमध्येही सिक्रेटसांता असा एक गेम खेळला जातो,

त्यातून प्रत्येकाला भेटवस्तू मिळत असते. व्हायरल झालेल्या होत असलेल्या व्हिडिओत एका प्राण्यांला गिफ्ट न मिळाल्याने सांता क्लॉजची नाकी नऊ कशी केली आहे ते आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका घरामगील मोकळा परिसर दाखवला गेला आहे. त्या परिसरातील झाड्याच्या बाजूला निळ्या रंगाचा ड्रम आहे तसेच एक व्यक्तीने सांता क्लॉजच्या ड्रेस परिधान केलेला आहे.

सांता क्लॉजचा ड्रेस घातलेला व्यक्ती त्या ड्रममध्ये लपण्याचा प्रयत्न करत असतो परंतू ड्रमच्या बाजूला एक बकरी असते ती त्याला ड्रम लपण्याच्या आधी तिच्या शिगांने मारण्याचा प्रयत्न करते. तो व्यक्ती ड्रममधून बाहेर निघून पळते तरीही बकरी त्या व्यक्तीची पाठ सोडत नाही. स्वत:ला वाचवण्यासाठी तो सर्व काही प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. शेवटी तिथं एक व्यक्ती येऊन बकरीला पकडून सांता क्लॉज झालेल्या व्यक्तीची सुटका करतो.

इन्टाग्रामवरील @kashyap_up_045 या पेजवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या पेजवर अनेक गमतीदार व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,' जब गिफ्ट देने में झोल झाल करता है सांटा,अब क्या होगा तेरा सांटा' असे गमतीदार कॅप्शन लिहिण्यात आले आहे.

याआधीही आपण सांताक्लॉज निगडित गमतीदार व्हिडिओ पाहिले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की,'क्या सांटा बनेगा रे तू' तर इतर यूजर्संनी हसण्याचे इमोजीस पाठवले आहेत.

Funny Viral Video
Viral Video: वा रे वा! सुगरण, लाटता लाटता चपाती फाटली; पोरीने सुई धाग्याने शिवून काढली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com