अमर घटारे
अमरावती : विदर्भात मान्सूनपूर्व कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या लागवडीसाठी कपाशीच्या बीटी अजित १५५ या वाणांची मागणी शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात होत असताना कंपनीकडून याचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने कृषी सेवा केंद्रात तुटवडा निर्माण झालेला आहे. मागणी पेक्षा पुरवठा कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
मान्सून तोंडावर असल्याने शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी सुरु झाली आहे. तसेच मान्सूनपूर्व लागवड करणाऱ्या (Farmer) शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी करून लागवड करण्यास सुरवात करण्यात आली आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांकडून कापसाच्या बीटी अजित १५५ या वाणाला अधिक मागणी असते. त्यादृष्टीने जिल्ह्यासाठी मागणी करण्यात येत असते. सदर कंपनीकडे अडीच लाखांवर (Amravati) पाकिटांची मागणी नोंदविण्यात आल्यानंतर जिल्ह्यासाठी फक्त ६५ हजार पाकिटांचे कंपनी कडून पाठवण्यात आले आहे. परिणामी या बियाण्याचा तुटवडा जाणवत आहे.
कृषी विभागाच्या निगराणीत कपाशीच्या अजित १५५ या बियाणाचे पाकीट एक शेतकऱ्याला दोन पाकीट असे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे बीटी अजित १५५ या कपाशीच्या बियाणांचा तुटवडा मार्केटमध्ये निर्माण झालेला आहे. कंपनीकडून या बियाण्याचा पुरवठा कमी होत असताना शेतकऱ्यांनी याची मागणी मोठ्या प्रमाणात केल्यामुळे याचा तुटवडा भासत आहे .कपाशीच्या बीटी बियाणांच्या पाकिटाची एमआरपी ८६७ रुपये असताना ग्रामीणमध्ये ९०० ते १२०० रुपयांप्रमाणे विक्री होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.