Beed News : तीन तालुक्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातून पाण्याची चोरी; कॅनॉलचा दरवाजा उघडून सोडले पाणी

Beed News : जलसंकट सगळीकडेच निर्माण झाले आहे. ज्या भागात तलाव आहे. तेथील पाणी साठा आरक्षित करण्यात आलेला आहे. यामुळे पाणी टंचाईवर मत करता येऊ शकते
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : दुष्काळी बीड जिल्ह्यात पाण्याची समस्या बिकट आहे. मात्र शासनाने आरक्षित केलेल्या तलावातील पाण्यावर पाणी माफियांनी डल्ला मारत चोरी केली आहे. थेट साठवण तलावाचे गेट उघडून पाणी कॅनॉलमध्ये सोडण्यात आले आहे. हा प्रकार रात्रीच्या सुमारास करण्यात आला. 

Beed News
Amravati News : तापमान वाढीमुळे संत्रा पडतोय गळून; अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागांना मोठा फटका

जलसंकट सगळीकडेच निर्माण झाले आहे. ज्या भागात तलाव आहे. तेथील पाणी साठा आरक्षित करण्यात आलेला आहे. यामुळे पाणी टंचाईवर मत करता येऊ शकते. दरम्यान बीड जिल्ह्यातील बीड, (Shirur) शिरूर, पाटोदा या तीन तालुक्याची तहान डोंबरी येथील साठवण तलावावर अवलंबून आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने या तलावामुळे पाण्याची तहान भागत आहे. परंतु तलावातून पाणी चोरी केली जात आहे. त्यामुळे आता या तालुक्यावर देखील पाणी संकट ओढवू शकते. 

Beed News
Dhule News : शिवसेना शिंदे गटाचे महावितरण कार्यालयात झोपून आंदोलन; भारनियमन विरोधात आक्रमक

रात्री दरवाजा उघडून सोडले पाणी 

बीडच्या (Beed) डोंबरी येथील साठवण तलावाचा दरवाजा उघडून पाणी थेट कॅनॉलमध्ये सोडण्यात आले आहे. रात्रीच्या सुमारास हा प्रकार करण्यात आला. विशेष म्हणजे हे काल रात्री सोडलेले पाणी आज दुपारपर्यंत सुरूच होते. त्यानंतर आता एरिगेशन विभागाच्या कर्मचाऱ्यासह ग्रामस्थांने दरवाजा बंद केला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com